मुरुम : रात्रगस्ती दरम्यान वाहनासह अवैध गुटखा जप्त 

 
d

मुरुम  :  मुरुम पोलीस ठाण्याचे सपोनि- श्री. इंगळे, पोलीस अंमलदार- होळकर हे आज दि. 30 जुलै रोजी पहाटे रात्र गस्तीस असताना अक्कलकोट रस्त्यावरुन जाणारी इनोव्हा कार क्र. एम.एच. 12 एलडी 5117 ही पोलीसांनी संशयावरुन थांबवली. यावेळी कामध्ये असलेल्या चालक व त्याचा सहकारी नरसिंह पवार व अनिल नवले, दोघे रा. बीड यांच्याकडे पोलीसांनी कारमधील पोत्यांविषयी विचारपुस केली. एकंदरीत त्या कारमधून प्रत्येकी 26 पोत्यांत गुटखा, पानमसाल्याची व सुगंधी तंबाखूची पुडकी असा 4,09,500 ₹ चा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ आढळल्याने पोलीसांनी जप्ती कारवाई केली होती.

            या कारवाईची माहिती तात्काळ उस्मानाबाद येथील अन्न औषध प्रशासनास देण्यात येताच तेथील निरीक्षक- नसरीन मुजावर यांनी मुरुम पोलीस ठाण्यात येउन तो माल तपासला असता महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. यावरुन निरीक्षक- नसरीन मुजावर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 328, 272, 273, 188, 34 अंतर्गत मुरुम पोलीस ठाण्यात आज दि. 30 जुलै रोजी गुन्हा नोंदवला आहे.

From around the web