मुरूम : रहदारीस धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या पाच व्यक्तीवर गुन्हे दाखल

 
crime

मुरुम  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायपने वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या 04 चालकांविरुध्द मुरुम पोलीसांनी कारवाया केल्या. यात 1) भिमाशंकर अम़त हॅम वय 35 वर्ष यांनी कमांडर  क्र. एम.एच. 13 एम 1569 हे वाहन  2) चंद्रकांत सुभाष जाधव वय 30वर्ष् यांनी कमांडर  क्र. एम.एच. 04 एए  7390 हे वाहन  तसेच 3) मुसाअली वलीसा इनामदार वय 55 वर्ष यांनी  कमांडर वाहन क्र. एम.एच. 25-1029 हे वाहन तर 4) संजय गण्‍पतराव रावळे वय 44 वर्ष यांनी कमांडर वाहन क्र. एम.एच. 34 एफ 0939  असे  मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकपने उभा केले. यावरुन मुरुम पोलीसांनी नमूद व्यक्ती विरुध्द स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.

उमरगा : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायपने वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या 01  चालकांविरुध्द उमरगा  पोलीसांनी कारवाया केली  1) अशोक गहनीनाथ भुरे हे त्यांचे ताब्यातील ॲपे वाहन क्र एम एच 25 बी 5382 हे सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने उभा केले यावरुन उमरगा पोलीसांनी नमूद व्यक्ती विरुध्द स्वतंत्र गुन्हा  नोंदवला आहे.

रस्ता अपघात

नळदुर्ग  : केशेगाव येथील प्रदीप वाघमारे यांनी दिनांक 22.02.2022 रोजी 20.00 वा ईटकळ येथील महामार्गावर मोटार सायकल चुकीच्या दिशेने चालवल्याने समोरुन येणा-या  मोटार सायकलला धडकली.या अपघातात वाघमारे यांच्या मोटार सायकलवर पाठीमागे बसलेले मारुती बगाडे हे किरकोळ जखमी झाले तर समोरील मोटार सायकलवरील नृसींग सानेपागुल वय 27 वर्ष, रा. सोलापुर  हे गंभीर जखमी होवुन उपचारादरम्यान मयत झाले.अशा मजकुराच्या मयताच्या पत्नीने अकस्मात मृत्युच्या चौकशी दरम्यान दिलेल्या निवेदना वरुन भा.दं.सं. कलम- 304 अ ,279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मालाविषयी गुन्हा करणा-यावर कारवाई

 उस्मानाबाद : शिंगोली तांडा येथे राजेश मारुती गायकवाड,रा.वसमत जि.हिंगोली व करण महादेव ससाणे व अनिल महादेव ससाणे दोघे रा.पिंपळनेरी  ता.उमरखेड जि.यवतमाळ हे दोघे काहीतरी मालाविषयी गुन्हा करण्याचे उददेशाने संश्ईतरित्या  दबा धरुन बसलेले मिळुन आलेने त्यांचेवर पोलीस ठाणे आनंदनगर येथे  मपोका  कलम 122 अन्वये गुन्हा नोदंवण्यात आला आहे.

From around the web