मुरूम : सोशल मीडीयात बदनामी करणा-यावर गुन्हा दाखल 

 
crime

मुरुम :  पुणे येथील एका महीलेसह तालुकयातील एका पुरुषाने दि. 02 एप्रिल पासुन अनेकदा मुरुम येथील एक महीला व तीच्या भावाच्या छायाचित्रासह अश्लील मजकुर समाजमाध्यमांत प्रसारीत करुन त्यांची बदनामी केली. यावरुन माहीती तंत्रज्ञान कायदा कलम 66,67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन ठिकाणी चोरी 

कळंब :  नागझरवाडी ता.कळंब येथील भैरवनाथ जाधव यांनी त्यांची स्पलेंडर मोटार सायकल क्रमांक एम एच 25 झेड 7329 ही दिनांक 04 एप्रिल रोजी 11.00 वा कळंब येथील बाजार मैदानात लावली असताना अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. यावरुन भा.द.स 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

येरमाळा :  पानगांव  ता.कळंब येथील तानाजी बेडके यांच्या बंद घराचे व शेजारच्या घराचे कुलुप  दि. 05-6 एप्रिल दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडुन आतील 20 ग्रॅम सुवर्ण दागीने, 2 मोबाईल फोन व चांदीचे पाऊल असा माल चोरुन नेला आहे.  अशा मजकुराच्या बेडके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

From around the web