मुरूम : रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद

 
crime

मुरूम : सुदंरवाडी, ता. उमरगा येथील- गुरूसिंगय्या राचय्या स्वामी यांनी दि. 23.01.2023 रोजी 10.30 वा. सु. ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 एफ 908, हा नाईकनगर स्टॅन्ड पाटीजवळ सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना मुरूम पोलीसांना आढळले.

लोहारा : मार्डी, लोहारा येथील- महेबुब शेख, दत्ता कदम तर लोहारा येथील- शमशोद्दीन शेख या तिघांनी दि.23.01.2023 रोजी 16.00 ते 17.00 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे मॅर्गो क्र. एम.एच. 25 आर 2183, छोटा हात्ती क्र. एम.एच. 04 ईवाय 8979 व टाटा टिगो क्र. एम.एच. 24 एएस 8291 ही वाहाने लोहारा येथे पाटोदा जाणारे रोडवर तर पेठसांगवी, ता. उमरगा येथील- शिवाजी हिपरगे, महादेव उदासे या दोघांनी याच दिवशी 16.00 ते 16.30 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे रिक्षा क्र. एम.एच. 25 बी 5682 रिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0040 हे पेठसांगवी ते नारंगवाडी जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना आढळले.

परंडा  : समतानगर, परंडा  येथील- दादाराव शिंदे यांनी दि.23.01.2023 रोजी 18.00 वा. सु. आपल्या ताब्यातील पॅगो क्र. एम.एच. 25 पी 3336  हा बार्शी ते परंडा जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना परंडा पोलीसांना आढळले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 7 गुन्हे नोंदवले आहेत.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 येरमाळा  : सुमटांना, ता. अहमदपुर येथील- भरत रघुनाथ पोले यांनी दि.23.01.2023 रोजी 19.30 वा.सु. कंटेनर क्र.एम.एच.14 केए 8027 हा चोराखळी पाटीजवळ रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

From around the web