नळदुर्गजवळ अज्ञात इसमाचा खून 

 
crime

नळदुर्ग  : एक अनोळखी पुरुष ज्याचे वय अंदाजे 50 वर्षे यास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या त्या पुरुषाचा मृतदेह अर्धवट जाळुन तो मृतदेह रामतिर्थ शिवारात नळदुर्ग ते लोहगाव रस्त्यावरील आलियाबाद पुलाजवळ टाकलेला असताना नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक- उमाजी पांडुरंग गायकवाड यांस दि. 08.12.2022 रोजी 11.41 वा. सु. आढळला. यावरुन उमाजी गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन अपघातात दोन ठार 

 उमरगा  : गुंजोटी, ता. उमरगा येथील- दिलीप किसन चौगुले यांनी दि. 04.12.2022 रोजी 21.00 वा. सु. जकेकुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील रस्त्यावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एटी 7190 ही निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याने पायी जाणारे- येळी ग्रामस्थ- मुरलीधर मोतीराम कोळी, वय 50 वर्षे यांना पाठीमागून धडकली. या अपघातात मुरलीधर यांच्या डोक्यास गंभीर मार लगून ते मयत झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अविनाश कोळी यांनी दि. 08.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील- मुनिरोद्दीन मैनोद्दीन शेख, वय 45 वर्षे हे दि. 05.12.2022 रोजी 20.00 वा. सु. उस्मानाबाद ते सोलापूर रस्त्यावरील कावलदरा येथील रस्त्यावर आपला ॲटो रीक्षा क्र. एम.एच. 25 एके 0274 हा इंडिकेटर लावून वळवत होते. यावेळी पहुणी, ता. अरणी, जि. चित्तोडगड, राज्य- राजस्थान येथील- प्रेमसिंग राणावत यांनी कंटेनर टेलर क्र. आर.जे. 09 जीसी 1925 हा भरधाव निष्काळजीपने चालवल्याने मुनिरोद्दीन यांच्या नमूद रीक्षास धडकल्याने मुनिरोद्दीन हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या चाँदपाशा सलीम शेख, रा. उस्मानाबाद यांनी दि. 08.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web