गुंजोटीत प्रेम प्रकरणावरून तरुणाची हत्या 

 
crime

उमरगा  : दिनांक 18 मार्च रोजी 23.00 वा सु  जावेद सिराज काझी वय 29 वर्ष रा. गुंजोटी याचे गावातीलच युवती बरोबर प्रेम असल्याचे कारणावरुन यातील आरोपी  राणी गंजेकर, नागोराव गंजेकर, राजेंद्र दुधभाते ,संदीप दुधभाते, यांनी संगणमत करुन मोबाईलद्वारे बोलाउन घेवुन जावेद याचे डोक्यास पंच सारख्या हत्यारने गंभीर जखमी करुन खुन केल्याचे सियाज काझी  यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाणीचे तीन गुन्हे 

तामलवाडी  : दिनांक 17 मार्च रोजी 10.30 वा सुभाष भिमा राठोड वय 40 वर्ष ,रा.खडकी तांडा ता.तुळजापूर हे होळी सणा निमित्त हंडा कार्यक्रमास गेला असता गावकरी अशोक जाधव, राजु जाधव, विजय जाधव, बाबु जाधव, कमलाबाई जाधव, ताराबाई जाधव, सोनु जाधव, अविनाश जाधव, रंजना जाधव यांनी किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन सुभाष राठोड यास काठीने  तर फिर्यादीचा मुलगा अजित यास सळईने मारुन जखमी केले अशा सुभाष भिमा राठोड यांनी दिले प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम, 143,147,148,149, 324,504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

ढोकी : तेर येथील अखील जमील काझी यांसह त्यांची पत्नी नुसरतजहाँ यांस भाउबंद निहाल काझी , ईलीयास, महमंद, याहया या सर्वांनी  सामुदाईक शेतीच्या वादातुन दिनांक 18 मार्च रोजी 11.00 वा शेतात लाथा बुक्यांनी ,गजाने मारहाण केली.अशा मजकुराच्या अखील काझी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम,324,504, 605,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  :  सागरगाव येथील ग्रामस्थ मिहिला ही दिनांक 18 मार्च रोजी 14.00 वा  तिचे शेतातील काम संपउन घरी येत असतांना यातील गावकरी असणारे अमोल महानवर, अण्णा महानवर, मुकेश महानवर यांनी पाठलाग करुन, माहाण करुन शिवीगाळ केली .अशा मजकुराच्या यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम,354 ,354 (ड),323,504,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web