उस्मानाबादेत खून , आरोपी गजाआड 

 
crime

उस्मानाबाद  : पारधी पिढी, उस्मानाबाद येथील- दादा रामा काळे यांनी जुन्या वादातून दि. 14.12.2022 रोजी 20.00 वा. सु. उस्मानाबाद येथील गावसुद जाणाऱ्या रस्त्यावर गावकरी- शरिफ ईस्माईल सय्यद, वय 32 वर्षे यांच्या डोक्यात लोखंडी गज, दगड मारुन त्यांना जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- शमशोद्दीन ईस्माईल सय्यद यांनी दि. 16.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी अटकेत

 पारधी पिढी, उस्मानाबाद येथील- दादा रामा काळे यांनी जुन्या वादातून दि. 14.12.2022 रोजी 20.00 वा. सु. उस्मानाबाद येथील गावसुद जाणाऱ्या रस्त्यावर गावकरी- शरिफ ईस्माईल सय्यद, वय 32 वर्षे यांच्या डोक्यात लोखंडी गज, दगड मारुन त्यांना जिवे ठार मारले होते. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- शमशोद्दीन सय्यद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 377/2022 हा नोंदवला आहे.

            सदर गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. चे पथक दि. 17.12.2022 रोजी सुतगीरणी, सांजा शिवार येथे असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, नमूद गुन्ह्यातील आरोपी हा कनगरा फाटा, ता. उस्मानाबाद येथे थांबलेला असून त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा सदरा आहे. यावर पथकाने लागलीच नमूद ठिकाणी धाव घेउन बातमीतील वर्णनाशी मिळताजुळता व्यक्ती आढळल्याने पथकाने त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव- दादा रामा काळे, रा. पारधी पिढी, उस्मानाबाद असे सांगीतले. यावर पथकाने त्यास अटक करुन पुढील कार्यवाहिस्तव उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. च्या पोनि- यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.

 

From around the web