वाशीत ढाब्याच्या नफ्याचे पैसे वाटपाच्या कारणावरुन खून
वाशी : यशवंडी शिवार, ता. वाशी येथील ‘श्याम शेखावाटी राजस्थान ढाबा’ चे चालक- मालक अनुपसिंह सुशील शर्मा, वय 35 वर्षे व अवनीश जागेराम मान यांच्यात ढाब्याच्या नफ्याचे पैसे वाटपाच्या कारणावरुन दि. 31 मे रोजी 21.30 ते 22.00 वा. दरम्यान ढाब्यावर वाद झाला. याच रागातून अवनीश मान यांनी भागीदार- अनुपसिंह यांच्या डोक्यात हातोडीने मारहान करुन व बतईने गळा चिरुन त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या मन्ना जगदीशडे (ढाबा आचारी) यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपहरण
उस्मानाबाद जिल्हा : एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 23 मे रोजी 11.30 वा. सु. आपल्या घरासमोर असताना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी हाणामारी
उमरगा : उमरगा येथील अजरुद्दीन रशीद बागवान हे दि. 01 जून रोजी 19.15 वा. सु. उमरगा येथील चैतन्य बारसमोर होते. यावेळी गावकरी- इरफान नाकीरशेख यांनी पुर्वीच्या मांडणाच्या कारणावरुन अजरुद्दीन बागवान यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन कोयत्याने वार करत असताना अजरुद्दीन यांनी तो वार उजवा हात आडवा केल्याने त्यांच्या हाताच्या बोटास जखम झाली. अशा मजकुराच्या अजरुद्दीन बागवान यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला अहे.
ढोकी : साठेनगर, ढोकी येथील नामदेव गोपीनाथ सोनपारखे, वय 55 वर्षे हे दि. 31 मे रोजी 17.00 वा. सु. गावातील ‘राजेश चित्र मंदीर’ समोर होते. यावेळी गावकरी- निशीकांत शिवाजी चांदणे यांनी तेथे जाउन पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन नामदेव सोनपारखे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नामदेव सोपनारखे यांनी दि. 01 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.