उस्मानाबादेत मोटारसायकलची चोरी
उस्मानाबाद : शाहुनगर, उस्मानाबाद येथील- नागेश रामराज ढोले यांची अंदाजे 10,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंन्डर मोटारसायकल क्र.एम.एच.25 वाय 5397 ही दि.23.12.2022 रोजी 09.00 ते सायंकाळी 07.00 वा. दरम्यान जिल्हाअधिकारी कार्यालय परिसर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नागेश ढोले यांनी दि.25.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
उमारगा : तुरोरी ता. उमारगा येथील- नामदेव लवटे यांनी दि. 25.12.2022 रोजी 13.00 वा. सु. उमारगा येथील एन.एच.65 आरोग्य बसस्थानक समोरील रस्त्यावर आपल्या ताब्यातील ॲपे रीक्षा क्र.एम.एच. 26 के 0751 हा रहदारीस धोकादायकरीत्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमारगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.