उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

 
crime

उस्मानाबाद  : एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 28.10.2022 रोजी 14.00 वा. सु. आपल्या राहत्या घरात एकटी असल्याची संधी साधून गावातीच एका तरुणाने तीच्या घरात प्रवेश करुन तीला आपल्या सोबत लग्न करण्याची सक्ती करुन बळजबरीने ओढत नेण्याचा प्रयत्न करुन तीचा विनयभंग केला. यावेळी त्या मुलीच्या दोन बहीणी तेथे आल्याने त्यांनी आरडाओरड करताच त्याने त्या मुलीस काठीने मारहान करुन तेथून पसार झाला. यावर त्या मुलीच्या पित्याने त्याला याचा जाब विचारला असता त्याने त्यांसही शिवीगाळ करुन दगडाने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पित्याने दि. 29.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 354 (अ), 452, 324, 323, 504, 506 सह पोक्सो कायदा कलम- 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
जुन्या वादातून हाणामारी 
 

 उस्मानाबाद : शालीमार कॉलनी, उस्मानाबाद येथील- सलमान पाशुमियाँ शेख यांनी दि. 29.10.2022 रोजी 14.30 ते 15.00 वा. दरम्यान अक्षय मेटल चौक, उस्मानाबाद येथे जुन्या वादाच्या कारणावरुन ठार मारण्याच्या उद्देशाने गावकरी- कमाल तमीज शेख, वय 45 वर्षे यांच्या डोक्यात, जबड्यावर, हातावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या कमाल शेख यांनी दि. 29.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web