दोन मोटारसायकलच्या धडकेत मामा - भाची ठार 

 
crime

उस्मानाबाद  : नारी, ता. बार्शी  ग्रामस्थ- शैलेश गायकवाड हे दि. 2 मार्च रोजी 20.30 वाजता भाची–शिवकन्या, वय- 2 वर्ष, यांसह गावकरी- तानाजी निव्रत्ती बदाले, वय- 26 वर्ष यांना मोटार सायकल क्र. एम.एच. 13 सी.एन 9793 वर सोबत घेवुन उस्मानाबाद-नारी रस्त्याने जात होते. यावेळी कौडगाव गा्रमस्थ –बालाजी विजय थोरात यांनी कौडगाव शिवारात चुकिच्या दिशेने निष्काळजीपणे मोटार सायकल चालवल्याने ती मोटार सायकल गायकवाड यांच्या मोटार सायकलला  समोरुन धडकुण अपघात झाला. या अपघातात भाची–शिवकन्या व तानाजी निव्रत्ती बदाले हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या शैलेश गायकवाड यांनी दि. 28 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 304 अ सह  मोवाका 184 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : परंडा येथील गणेश प्रफुल्ल बनसोडे, वय- 23 वर्ष,  हे दि. 14 मार्च रोजी 10.45 वाजता परंडा – बार्शी रस्त्यावरील  सीआर पेट्रोलिअम विक्री केंद्राजवळुन मोटार सायकल चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने निष्काळजीपणे अज्ञात वाहन चालवल्याने त्या वाहनाची धडक बनसोडे यांच्या मोटार सायकल सोबत झाली. या अपघातात बनसोडे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- प्रफुल्ल यांनी दि. 28 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 279, 304 अ सह  मोवाका 184 अंतर्गत्‍ गुन्हा नोंदवला आहे.

शरीराविरुध्दचे गुन्हे

लोहारा :  नागुर गावातील सचिन थोरात व नितीन शिंदे या दोंन्ही कुटुंबात जुने वैमनस्य असुन हाच वाद दि. 27 मार्च रोजी 14.00 वाजता गावात उफाळुन आला. यात दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस शिवीगाळ करुन व ठार मारण्याची धमकी देउन काठीने, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या परस्पर विरोधी 2 प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 323,324,504,506,34 अंतर्गत्‍ 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web