लोहारा : खुनाच्या  गुन्ह्यातील आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

 
crime

लोहारा  : लोहारा पोलीस ठाणे गुन्हा क्र. 27/ 2018 सत्र खटला क्र. 11/2018 या खटल्याची सुनावनी उमरगा येथील सत्र न्यायालयात सुरु होती. या खटल्याचा निकाल आज दि.28 जुलै रोजी अति. सत्र न्यायाधीश मा. श्री. अनभुले यांच्या न्यायालयात जाहीर झाला. यात आरोपी श्री. वैजीनाथ किसन ओवाडे, वय- 35 वर्षे रा. हिप्परगा (स.), ता. लोहारा यांस खून करुन भा.दं.सं. कलम- 302 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून आजन्म कारावासह 50,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल


उस्मानाबाद  : सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणे, बेदरकारपणे वाहन चालवने, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवने अशा प्रकरणी उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 27 जुलै रोजी खालील प्रमाणे कारवाया केल्या.

1) लोहारा पो.ठा. हद्दीत चिंचोली (काटे) येथील गोपाळ कोळी व करजगाव येथील नानाराव गवळी या दोघांनी 11.30 वा. सु. आपापली वाहने माकणी गावातील चौकात तर जेवळी (उ.) येथील रविराज गोंधळे यांनी आपले वाहन गावातील सार्वजनिक रस्त्यावर व लोहारा येथील कमलेश पाल यांनी आपले वाहन लोहारा येथील डॉ. आंबेडकर चौकात तसेच उस्मानाबाद (श.) पो.ठा. हद्दीत उस्मानाबाद येथील दत्ता घोणे, शुभम गायकवाड, दयानंद ढेकणे यांनी उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक रस्त्यावर व ढोकी पो.ठा. हद्दीत तडवळा ग्रामस्थ- मोहम्मद शेख यांनी तडवळा गावातील सार्वजनिक रस्त्यावर आपले वाहन रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

2) उस्मानाबाद (श.) पो.ठा.हद्दीत मेडसिंगा ग्रामस्थ- सिध्देश्वर शेलार व वाशी ग्रामथ्स- सुरेश साळुंके, उस्मानाबाद ग्रामस्थ- बारी कुरेशी यांनी आपापली वाहने उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक रस्त्यावर तर काक्रुंबा येथील संतोष कांबळे यांनी आपले वाहन तुळजापूर येथील सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपने, बेदरकारपने चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले.

3) कळंब पो.ठा. हद्दीत नायगाव ग्रामस्थ- विलास पवार व मंगरुळ ग्रामस्थ- शरद माने हे कळंब येथील सार्वजनिक रस्त्यावर तर अंबाजोगाई येथील गंगाधर बनसोडे यांनी येरमाळा येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापली वाहने मद्यधुंद अवस्थेत चालवून भा.दं.सं. कलम- 185 चे उल्लंघन केले.

From around the web