लोहारा : पोलीस चौकी पेटवून देण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल 

 
crime

लोहारा : लोहारा पोलीसांनी फौ.प्र.सं कलम 149  अंतर्गत दिलेल्या नोटीसचा भंग करुन दि. 4 एप्रिल रोजी 13.00 ते 13.40  दरम्यान कचरु सगट, रा. माळुंब्रा, मनिषा जाधव, रा. चिंचोली यांसह 16  स्त्री – पुरुषांनी रास्ता रोको आंदोलनाचे स्थळ वेळोवेळी  बदलवुन लोहारा येथील डॉ.आंबेडकर चौकात वाहने आडवी लावुन व गर्दी जमवुन रास्ता रोको केला. 

यावेळी नमुद लोकांनी लोहारा पोलीसांचे नाव घेवुन पेालीसांविरोधात अश्लिल भाषणे करुन शिवीगाळ केली. तसेच आमच्या जातीच्या नादी लागल्यास पोलीस चौकी पेटवुन देण्याची धमकी दिली. अशा प्रकारे नमुद लोकांनी अवैध जमाव जमवुन, पोलीसांच्या आदेशाची जाणीवपुर्वक अवहेलना करुन जनमानसात पोलीसांची प्रतीमा मलिन होउन पोलीसां प्रती असंतोष निर्माण करण्याचा जाणीव पुर्वक प्रयत्न केला.यावरुन पोलीस अंमलदार – सदाशिव पांचाळ यांनी सरकार तर्फै दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143, 188, 294, 341, 504, 506 तसेच पोलीस अप्रीती अधिनीयम कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीसांच्या कर्तव्यात अडथळा आणणा-यावर गुन्हा दाखल 

परंडा : पाटील गल्ली परंडा येथील औदुंबर प्रकाश पाटील हे दि. 2 एप्रिल रोजी 17.00 वाजता शेतात असताना गावकरी- उमाकांत पाटील यांसह त्यांची पत्नी- पल्लवी, मुलगे- क्रष्णा, मुकुंदा, रामराजे, गोविंदा यांनी शिवीगाळ करुन कु-हाडीने मारहाण केली होती. या प्रकरणी औदुंबर यांच्या दि.4 एप्रिल रोजीच्या प्रथम खबरेवरुन गुन्हा क्रमांक 94/2022 हा नोंदवण्यात आला होता. 

उपरोक्त नमुद गुन्हयातील आरोपीच्या शेाधार्थ परंडा पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार ससाने यांसह महिला पोलीस हेड कॉन्सटेबल मुल्ला, पेाना भांगे, शेवाळे, ग्रहरक्षक दल अंमलदार खराडे व कदम असे दि. 4 एप्रिल रोजी 22.30 वाजता पाटील वस्ती परंडा येथे गेले होते. यावेळी उमाकांत पाटील हे त्यांची पत्नी- पल्लवी, मुलगे- क्रष्णा, मुकुंदा, रामराजे, गोविंदा यांसह घराबाहेर बसलेले होते. यावेळी पोलीसांनी उमाकांत यांना गुन्हयाची हकीकत सांगुण पोलीसांना सहकार्य करण्यास सांगितले असता नमुद पाटील कुटुंबीयांनी  कु-हाड व दगड उगारुन  पोलीसांना अरेरावी सुरु करुन सपोनि- ससाने यांसह पोलीस नाईक- भांगे यांना पकडुन आपल्या घरात नेउन दार आतुन बंद केले.

 पोलीसांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याच्या धमकी देउन त्यांनी पथकास शिवीगाळ व धक्का बुक्की केली. यावेळी उमाकांत याने केलेला कु-हाडीचा वार चुकवण्याच्या प्रयत्नात सपोनि ससाणे व पोलीस नाईक- भांगे यांच्या हातास जखम झाली.  बाहेरील पोलीसांनी घराचे दार तोडुन सपोनि- ससाने व पेालीस नाईक- भांगे यांना घराबाहेर काढले असता नमुद लोकांनी त्यांच्या डोळयात मिर्ची पुड फेकुन पुन्हा धक्का बुक्की केली.अशा प्रकारे नमुद लोकांनी पोलीसांच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केल्याने सपोनि- ससाने यांनी सरकार तर्फै दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143,149,307,324, 353, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web