भूम : चिंचोली ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार, गुन्हा दाखल 

 
crime

भूम : कोविड- 19 साथीमुळे सन- 2020 मध्ये ग्रामपंचायतीच्या सभा झाल्या नसून सरपंच, ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ते संबंधी ठराव, भाडेकरार करण्याचा अधिकार नाही. तरीही चिंचोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच- महादेव वारे यांसह भास्कर वारे, सोमनाथ चौधरी, रतनबाई वारे, तात्यासाहेब वारे, वसुदेव साबळे, युवराज साळुंके, आश्रुबा चव्हाण, मैनाबाई साळुंके यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यवाही नोंदवहीत सभा झाल्याच्या, ठरावाच्या खोट्या नोंदी व ग्रामसेवक रायकर यांच्या खोट्या सह्या केल्या. 

या खोट्या ठरावाच्या आधारे त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेचा भाडेकरार रनजीत शिर्के यांच्यासोबत केला.अशा मजकुराच्या ग्रामसेवक- दिलीप रायकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 468, 469, 470, 471, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीचे दोन गुन्हे दाखल 

उस्मानाबाद : पवारवाडी, ता. उस्मानाबाद येथील आकाश बिभिषन मुंढे यांचा व्हीवो एस-9 हा स्मार्टफोन गावातील त्यांच्या ‘आकाश अर्थमुव्हर्स’ या दुकानातून दि. 27 मे रोजी 07.00 ते 09.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या आकाश मुंढे यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : छत्रपती नगर, परंडा येथील राजेंद्र परमेश्वर जाधव यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 3291 ही व गोपाळ शेटीबा जाधव, रा. भोंजा, ता. परंडा यांची मो.सा. क्र. एम.एच. 16 एएच 9667 ही दि. 27- 28 मे रोजी दरम्यानच्या रात्री छत्रपती नगर येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजेंद्र जाधव यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 

From around the web