लाखनगाव : डुक्करास वाचवण्याच्या प्रयत्नात एकाचा मृत्यू, एक जखमी 

 
crime

वाशी : लाखनगाव, ता. वाशी येथील शाहु नामदेव ढोपे, वय 55 वर्षे यांसोबत गावकरी- कैलास गणपत गिरी, वय 66 वर्षे हे दि. 16.04.2022 रोजी 22.00 वा. सु. पारा शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 5601 ने प्रवास करत होते. यावेळी मो.सा. समोर अचानकपने आलेल्या डुक्करास वाचवन्याच्या प्रयत्नात शाहु ढेपे यांची मो.सा. घसरली. या अपघातात शाहु ढेपे स्वत: मयत होउन कैलास गिरी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या पंजाब नामदेव ढेपे, रा. लाखनगाव यांनी दि. 01 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मयत- शाहु ढेपे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 34 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


येरमाळा  : चालक- मानसिंग बाळकृष्ण गायकवाड, रा. तेलगाव (बु.), ता. धारुर, जि. बीड यांनी दि. 07.04.2022 रोजी 07.00 वा. सु. येरमाळा येथील रस्त्यावर कार क्र. एम.एच. 44 जी 0978 ही निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याने पायी जाणारे विकास वामन मोरे, वय 29 वर्षे, रा. येरमाळा यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात विकास मोरे हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या विकास मोरे यांनी दि. 01 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web