कानेगाव : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 
crime

लोहारा  : कानेगाव, ता. लोहारा येथील श्रीरंग गणपती पाटील, दिलीप निवृत्ती कदम, नितीन नागनाथ पाटील, अज्ज्वल नारायण कदम, नामदेव साहेबराव लोभे, बाबा तुकाराम पाटील, त्र्यंबक यशवंत मोरे, पंकज दिलीप पाटील, नारायण साहेब लोभे, ज्ञानेश्वर त्र्यंबक लोभे या सार्वांच्या मानसिक त्रासास कंटाळून गावकरी- अंकुश फुलचंद गायकवाड, वय 30 वर्षे यांनी दि. 28.04.2022 रोजी 23.00 वा. सु. गावातील समाज मंदीराच्या कुंपनातील पिंपळाच्या झाडास गळफास घेउन आत्महत्या केली. अशा मजकुराच्या मनोज फुलचंद गायकवाड, रा. कानेगाव यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306 सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जिल्ह्यात तीन ठिकाणी हाणामारी 

तुळजापूर  : हंगरगापाटी, ता. तुळजापूर येथील निलेश शिंदे व रावळ गल्ली, तुळजापूर येथील अमित माधवराव कुतवळ यांच्यात जवाहर चौकात वाहतुकीस अडथळ्याच्या कारणावरुन वाद झाला होता. या वादाच्या रागातून निलेश शिंदे यांसह अजय काळे, सुरज शिंदे, अनिल भोसले यांनी दि. 27.04.2022 रोजी 17.30 वा. सु. हिप्परगा पाटी येथे अमित कुतवळ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठी, कत्तीने मारहान करुन गंभीर जखमी केले. तसेच नमूद चौघांनी, “आमच्या नादाला लागलास तर तुझ्या विरुध्द ॲट्रॉसिटीची केस करु.” असे अमित कुतवळ यांना धमकावले. अशा मजकुराच्या अमित कुतवळ यांनी दि. 29 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : चिंचोली (भु.), ता. उमरगा येथील भगवान लक्ष्मण दासमे व हिराजी लक्ष्मण दासमे या दोघा भावांत शेतजमीनीच्या मालकीवरुन वाद आहे. दि. 29.04.2022 रोजी 09.00 ते 10.00 वा. सु. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन चिंचोली (भु.) शेत शिवारात नमूद दोघांच्या कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबाती सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन चावा घेउन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भगवान दासमे व हिराजी दासमे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत परस्परविरोधी 2 गुन्हे नोंदवले आहेत.

उमरगा  : तलमोड, ता. उमरगा येथील संतोष आनंदराव घोडके हे दि. 29.04.2022 रोजी 04.00 वा. सु. तलमोड येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी अजय लहू चिंताले यांसह अन्य तीन अनोळखी पुरुषांनी संतोष घोडके यांच्याशी मागील भांडणाची कुरापत वाद घालून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, हंटरने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संतोष घोडके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

.                                     

From around the web