कळंब : लुटीतील मोबाईल फोनसह तीन आरोपीना अटक
उस्मानाबाद : इंदीरानगर, कळंब येथील- आश्रुबा जगन्नाथ शिंपले, वय 26 वर्षे हे दि. 26.09.2022 रोजी 02.00 ते 03.00 वा. सु. मलकापुर फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावरुन मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान एका मोटारसायकलवर आलेल्या चार अनोळखी ईसमांनी त्यांची मो.सा. आश्रुबा यांच्या मो.सा. ला समोर आडवी लाउन आश्रुबा यांच्याजवळील अंदाजे 15,000 ₹ किंमतीचा ओपो मोबाईल फोन व 22,100 ₹ रोख रक्कम असा एकुण 37,100 ₹ चा माल जबरीने घेउन गेले होते. अशा मजकुराच्या आश्रुबा शिंपले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 266/2022 हा नोंदवला आहे.
सदर गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बबन नाना काळे उर्फ मुक्या, वय 19 वर्षे, रा. चांदवड, ता. भुम यास दि. 06.10.2022 रोजी 17.30 वा. सु. चांदवड येथील त्याच्या राहत्या घरातून नमूद लुटीतील मालापैकी मोबाईल फोनसह ताब्यात घेतले. पथकाने त्याच्याकडे अधिक तपास केला असता नमूद गुन्ह्यातील त्याचे साथीदार कळंब तालुक्यातील घाटनांदुर ग्रामस्थ- अभय प्रभु सोनवणे, वय 25 वर्षे व रणजीत श्रीधर बेरगळ, वय 27 वर्षे हे दोघे असल्याचे समजले. यावर पथकाने त्यांसही घाटनांदुर परिसरातून ताब्यात घेउन त्या तीघांनी गुन्हा करण्यास वापरलेली हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एयु 7239 ही हस्तकत करुन त्या तीघांना लुटीतील मोबाईल फोन व गुन्हा करण्यास वापरलेल्या नमूद मो.सा. सह पुढील कारवाईस्तव येरमाळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून त्यांच्या उर्वरीत साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक . नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि- यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि-. शैलेश पवार, पोउपनि- . संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, विनोद जानराव, अमोल चव्हाण, रविंद्र आरसेवाड, सुनिल मोरे, महेबुब अरब यांच्या पथकाने केली आहे.