कळंब : ४० हजारांची लाच स्विकारताना भूमापक खरात गजाआड

 
lach

कळंब   - एका शेतकऱ्याची वडीलोपार्जित जमिनीची मोजणी करून हद्द कायम करुन नकाशा देण्यासाठी ४० हजारांची लाच स्विकारताना कळंब येथील भूमापक प्रशांत अरुणकुमार खरात यास एसीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. . 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळंब तालुक्यातील एका २६ वर्षीय शेतकऱ्याच्या वडीलोपार्जित जमीनीची लवकरात लवकर मोजणी करुन हद्दी कायम करुन देण्यासाठी ते भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते या कार्यालयात सतत हेलपाटे मारीत होते. या कार्यालयातील कार्यरत असलेले वर्ग ३ चे लोकसेवक भूमापक प्रशांत अरुणकुमार खरात वय ३६ वर्षे त्या शेतकऱ्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी ४० हजार रुपयांची लाच पंचा समक्ष स्विकारली. लाच स्विकारताना खरात यांना रंगेहात पकडून जेरबंद केले. 

हा सापळाऔरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे व उस्मानाबाद येथील पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  विकास राठोड यांनी सापळा रचून केली.‌ ही कामगिरी पोलिस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने केली.

 लाचे संदर्भात तक्रार असल्यास आमचे कार्यालयीन संपर्क क्र. २४७२ - २२२८२९ वर व पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते मो. क्र. ९५२७९४३१००, पोलिस निरीक्षक अशोक हुलगे मो. क्र. ८६५२४३३३९७, विकास राठोड क्र. ७७१९०५८५६७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

From around the web