कळंब : अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणी आरोपीस आठ वर्षांची सक्तमजुरी 

 
court

उस्मानाबाद - अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास भीक मागण्यास लावल्याप्रकरणी आरोपीस आठ वर्षांची सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 


याबाबत अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ऍड. आशिष कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी महादेव जनार्धन टिंगरे (रा.लिमटेक ता.बारामती जि. .पुणे) हा सायकल कसरतीचे खेळ गावो-गावी करून आपला उर्धरनिवाह करीत होता. सदर कसरतीच्या खेळामधुन जास्तीचे पैसे मिळावे, या उद्देशाने सदर आरोपीने कळंब येथील अशोक रामचंद्र शेळके यांच्या अल्पवयीन मुलाचे  चौंदे गल्ली येथून १२ नोव्हेंबर २०१९ रोजी अपहरण केले.त्यानंतर आरोपीने त्या मुलास वेळोवेळी सायकलच्या कसरतीचे खेळ करावयास लावून लोकांकडून पैसे व भाकरी अशा प्रकारे भीक मागायला लावली.

 त्यानुसार फिर्यादी अशोक शेळके यांनी कळंब पोलिस ठाणे येथे  दि. १३ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास  पोलिस निरीक्षक टी.बी दराडे व  सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.डी पवार यांनी केला. या प्रकरणात पोलिस विभागाच्या वतीने विविध सोशल मीडियावर मुलाच्या अपहरणा संदर्भातील माहिती दिली. त्यामुळे सदरील आरोपी हा बारामती शहराकडे गेल्याची माहिती मिळताच  पोलिसांनी लिमटेक येथे आरोपीच्या घरी धाड टाकून आरोपीस जेरबंद करून आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास  पालकांकडे सुपूर्त केले.

या प्रकरणी आरोपी विरोधात कळंब पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात कलम ३६३ व ३६३ (अ) (1) अन्वये दोषारोपत्र दाखल केले. या प्रकरणी एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन मुलाची साक्ष महत्वपुर्ण ठरली. तसेच अतिरिक्त जिल्हा सकारी वकील ऍड. आशिष कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तीवादाच्या आधारे आरोपीस आठ  वर्षांची सक्तमजुरी व आठ हजार रूपए दंडाची शिक्षा दोन कलामा अन्वये  सुनावण्यात आली आहे.सदर शिक्षा ही आरोपीस एकत्रीत भोगावयाची आहे.

From around the web