कळंब :  गौण खनिज (वाळु) अवैध वाहतुक प्रकरणी गुन्हा दाखल

 
crime

कळंब  : कळंब येथील- मुस्तफा नासेर शेख हे दि. 31.08.2022 रोजी 13.30 वा. सु. इंदीरानगर, कळंब येथील रस्त्याने विना नोंदणी क्रमांकाच्या न्यु हॉलंड ट्रॅक्टर- ट्रेलरमधून सुमारे 1 ब्रास वाळु वाहतुक करत असताना उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांच्या पथकास आढळले. यावर पोलीसांनी वाळु वाहतुकीच्या व चालक परवान्याबाबत शेख यांच्याकडे चौकशी केली असता ती वाळु विनापरवाना वाहुन नेत असल्याचे तसेच चालक परवाना नसल्याचे समजले. यावरुन उप‍ विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब येथील- पोलीस अंमलदार- नवनाथ खांडेकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन चालक- शेख यांसह ट्रॅक्टर- ट्रेलर मालक- धनाजी कापसे, रा. कळंब या दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 379, 34 सह गौण खनिज कायदा कलम- 21 व मो.वा.का. कलम- 50/177, 13/177 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 कळंब : हासेगाव, ता. कळंब येथील- शिवाजी अशोक खापे हे दि. 05.09.2022 रोजी 19.10 वा. सु. कळंब येथील तांदुळवाडी रस्त्यावर आपल्या ताब्यातील मोटारसायकल मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 185 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 लोहारा  : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील समाज मंदीरासंबंधी दोन गटांत वाद असल्याने त्या उप विभागीय दंडाधिकारी, उमरगा यांच्या आदेशाने त्या समाज मंदीराच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू आहे. गावकरी- श्रीकांत कदम यांसह इतर 40 ते 50 लोकांनी दि. 04.09.2022 रोजी 15.30 वा. सु. त्या समाज मंदीराच्या 100 मीटर परिसरात जमून घोषणाबाजी करुन भा.दं.सं. कलम- 143, 145, 147, 149, 188, 341 चे जाणीवपुर्वक उल्लंघन केले. यावरुन लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार- सदाशिव पांचाळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दि. 05.09.2022 रोजी नोंदवला आहे.

From around the web