उस्मानाबाद , तुळजापूर, मुरूम, परंडा येथे चोरीची घटना 

 
crime

मुरुम  : सुभाष चौक, मुरुम येथील- महेश शिवशंकर निंबर्गे यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची टिव्हीएस स्टार मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएच 0253 ही दि. 18.09.2022 रोजी 12.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुरुम येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेश निंबर्गे यांनी दि. 18.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

परंडा  : डोमगाव, ता. परंडा येथील- मुरली ब्रम्हाम बले, व्यवसाय- मासेमारी हे दि. 03.09.2022 रोजी 14.00 वा. सु. डोमगाव येथील सिना कोळेगाव धरणाकडेला असताना त्यांचा अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन बले यांच्या नकळत चोरुन नेला. अशा मजकुराच्या मुरली बले यांनी दि. 18.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उस्मानाबाद  : लक्ष्मी कॉलनी, समर्थनगर, उस्मानाबाद येथील- शरद भुजंगराव जाधवर हे दि. 17.09.2022 रोजी 14.00 वा. ते दि. 19.09.2022 रोजी 10.00 वा. दरम्यान आपले घर कुलूप बंद करुन बाहेरगावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील डीव्हीआर बॉक्स, टायटन कंपनीचे 2 व कॅसीवो कंपनीचे 1 असे तीन मनगटी घड्याळ असा एकुण 11,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या शरद जाधवर यांनी आज दि. 19.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : व्होनाळा, ता. तुळजापूर येथील- नवनाथ विठोबा मारकड यांच्या बारुळ गट क्र. 496 मधील शेतातील पत्रा शेडमधील 1 वर्षाचे व 8 महिन्याचे असे दोन बोकड व शेततळ्यातील 3 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप तसेच शेजारील गणेश घोगरे यांच्याही शेतातील 5 अश्वशक्ती क्षमतेचा लक्ष्मी कंपनीचा पानबुडी विद्युत पंप असा दोघांचा एकुण 25,000 ₹ किंमतीचा माल दि. 17.09.2022 रोजी 21.30 वा. ते दि. 18.09.2022 रोजी 07.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या नवनाथ मारकड यांनी दि. 19.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web