उस्मानाबाद, परंडा, लोहारा येथे चोरीची घटना 

 
crime

उस्मानाबाद  : निर्मल वसाहत, श्रीकृष्णनगर, उस्मानाबाद येथील- विशाल मधुकर राहिगुडे यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 03.09.2022 रोजी 06.00 ते 04.09.2022 रोजी 06.30 वा. दरमयान तोडून घरात प्रवेश करुन आतील 2 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 40 ग्रॅम चांदीचे निरंजन, ए‍ि डिजीटल तिजोरी व 5,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 15,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विशाल राहिगुडे यांनी दि. 06.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : मंगळवार पेठ, परंडा येथील- श्रीराम एकनाथ चैतन्य यांच्या गट क्र. 51 मधील शेतातील 100 फुट केबल, स्टार्टर व ॲटोस्विच असा एकुण 6,500 ₹ चे साहित्य अज्ञात व्यक्तीने दि. 30.08.2022 रोजी 11.00 वा. ते दि. 01.09.2022 रोजी 11.00 वा. दरम्यान चोरुन नेले. अशा मजकुराच्या श्रीराम चैतन्य यांनी दि. 06.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा  : वडगाववाडी शिवारातील इंन्डस कंपनीच्या टॉवरच्या सेल्टर जाळीमधील अमारराजा कंपनीच्या 24 बॅटऱ्या अज्ञात व्यक्तीने दि. 24.08.2022 रोजी 01.52 ते 02.20 वा. दरम्यान चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या कंपनी कर्मचारी- महादेव ढवण यांनी दि. 06.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या ट्रेलर व नांगरासह आरोपी अटक

परंडा  : पाचपिंपळा, ता. परंडा येथील- रणजित महाविर मंगरुळे यांच्या ट्रॅक्टरचा ट्रेलर त्यांच्या घरासमोरील अंगनातून तर गावकरी- विलास विठ्ठल खैरे यांचा पाच फाळाचा नांगर अज्ञात व्यक्तीने दि. 03.09.2022 रोजीच्या रात्री चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या रणजित मंगरुळे यांनी दि. 05.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

            तपासादरम्यान परंडा पोलीस ठाण्याच्या पोनि-  सुनिल गिड्डे यांच्या पथकाने माहिती घेतली असता पाचपिंपळा ग्रामस्थ- गणेश सांगळे याचा चोरीत सहभाग असावा अशी पोलीसांची खात्री झाली. यावर आज दि. 07 सप्टेंबर रोजी पोलीसांनी सांगळे यांस अटक करुन नमूद चोरीतील ट्रेलर व नांगरासह ती चोरी करण्यासाठी वापरलेला स्वराज ट्रॅक्टर त्यांच्या ताब्यातून जप्त केला आहे.  

From around the web