वालवड, सिंदफळ, आरळी येथे चोरीची घटना 

 
crime

भूम  : वालवड, ता. भुम येथील हरिश्चंद्र किसन शेळके यांच्या स्वयंपाक खोलीच्या दरवाजाची कडी अज्ञात व्यक्तीने दि. 04.05.2022 रोजी 04.00 वा. सु. उघडून घरातील लोखंडी पेटीमधील 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, एक भ्रमणध्वनी व 10,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या हरिश्चंद्र शेळके यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : सिंदफळ, ता. तुळजापूर येथील गणेश लक्ष्मण गोसावी यांनी दि. 04.05.2022 रोजी 12.45 वा. सु. तुळजापूर येथील आंबेडकर चौकात त्यांच्या मोटारसायकलीस विवो स्मार्टफोन व 2.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने असलेली पिशवी अडकवलेली असता ती पिशवी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गणेश गोसावी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : आरळी (खु.), ता. तुळजापूर येथील अथर्व रविंद्र पाटील यांच्या शेत गट क्र. 20 मधील शेत विहीरीतील 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 02.05.2022 रोजी 01.00 ते 04.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अथर्व पाटील यांनी दि. 04 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रस्ता अपघात

ढोकी : सौंदना, ता. कळंब येथील अमित चर्तभुज कुटे यांसोबत अशोक कालीदास जावळे, वय 48 वर्षे हे दि. 03.05.2022 रोजी 17.20 वा. सु. खामगाव शिवारातील रस्ता वळणावर मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी अमित कुटे यांनी मो.सा. निष्काळजीपने चालवल्याने मो.सा. वर पाठीमागे बसलेले अशोक जावळे हे खालीपडून त्यांच्या डोक्यास गंभीर जखम होउन ते मयत झाले. अशा मजकुराच्या संदिप प्रदिप जावळे, रा. सौंदना यांनी दि. 04 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web