तुळजापुरात एका वृद्धास दोन महिलांनी फसवले 

 
crime

तुळजापूर - उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. तुळजापूर शहरात एका बहात्तर वर्षीय वृद्धास दोन अनोळखी महिलांनी हातोहात फसवल्याची घटना शुक्रवारी  घडली असून, शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा येथील ७२ वर्षीय बलभीम साधू लोखंडे हे  दि. ८ जुलै रोजी सायंकाळी तुळजापूर येथील टपाल कार्यालयाजवळील रस्त्याने पायी जात होते. यावेळी दोन अनोळखी महिलांनी लोखंडे यांस हटकून, “ आमचा लहान मुलगा आजारी असुन त्यास दवाखान्यात दाखल करायचे आहे. आमच्याजवळील 10 ग्रॅमची सोन्याची बोरमाळ घ्या व आम्हाला पैसे द्या.” असे म्हणाल्या. यावर लोखंडे यांनी काहीएक विचार न करता ती बोरमाळ घेउन आल्याजवळील 20,000 ₹ रक्कम त्या दोघींना दिली. 

त्या दोघींनी आपल्याला सोन्याची बोरमाळ असल्याचे सांगून बनावट बोरमाळ देउन आपली फसवणूक केल्याचे लोखंडे यांच्या लक्षत आले. अशा मजकुराच्या बलभिम लोखंडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुरुम  : कुन्हाळी, ता. उमरगा येथील बबलू अर्जुन भोसले उर्फ सुरज, वय 30 वर्षे हे मालाविषयी गुन्हा करण्याच्या उद्देशाने तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने दि. 09 जुलै रोजी सायंकाळी मुरुम येथे अवैधरित्या तलवार हातात घेउन फिरत असल्याची गोपनीय खबर मुरुम पो.ठा. च्या पथकास मिळाली. यावर मुरुम पो.ठा. च्या सपोनि- श्री. जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने 20.15 वा. सु. बबलु भोसले यांस मुरुम येथील दर्शन चायनिज सेंटरसमोरुन ताब्यात घेउन तलवार जप्त केली आहे. यावरुन मुरुम पो.ठा. चे पोलीस अंमलदार- मारुती मडोळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.

 उस्मानाबाद  : सार्वजनिक रस्त्याकडेला हातगाड्यावर तसेच हॉटेल समोर टेबलावरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत कणाऱ्यांवर उस्मानाबाद पोलीसांनी दि. 09 जुलै रोजी कारवाया केल्या. यात अंबी ग्रामस्थ- अनिल शहाजी गटकळ, शेळगांव ग्रामस्थ- बाळु नवनाथ धेंडे या दोघांनी अंबी पोलीस ठाणे हद्दीत तर कळंब येथील समीरअल्ली अमीरअल्ली सय्यद, सोहेल पाशा बागवान यांनी कळंब पोलीस ठाणे हद्दीत तसेच येरमाळा ग्रामस्थ- दत्ता किसन बारकुल यांनी येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत आपापल्या हातगाड्यांवरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करुन पदार्थ वयार करत असताना आढळले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

From around the web