उस्मानाबादेत  मागील भांडणावरून तरुणाच्या दोन गटात हाणामारी

 
crime

उस्मानाबाद : अमीन चौक, उस्मानाबाद येथील- छोट्या शेख, दाउद शेख यांनी मागील भांडणाच्या कारणावरून दि.02.01.2023 रोजी 21.30 वा.सु. खाजानगर येथील एका दुकानासमोर ठार मारण्याच्या उद्देशाने गल्लीतीलच- फैजान इब्राहिम काजी यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले. 

तसेच यावेळी फैजान यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या भावासही छोट्या व दाउद यांसह हैदर शेख, नवाज शेख यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या फैजान काझी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दि. 03.01.2023 रोजी नोंदवला आहे.


चोरीचे दोन गुन्हे दाखल 

येरमाळा  : येरमाळा, ता. कळंब येथील- सतीश रघुनाथ मोरे यांच्या येरमाळा गट क्र. 347/218 मधील शेतातील अंदाजे 3500 ₹ किंमतीचे फिनोलेक्स कंपनीचे तुषारसिंचन संचाचे साहित्य अज्ञात व्यक्तीने दि.01.01.2023 रोजी 16.00 ते दि.02.01.2023 रोजी 09.00 वा. दरम्यान चोरुन नेले. अशा मजकुराच्या सतीश मोरे यांनी दि. 03.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी  : दि. 31.012.2022 रोजी 23.30 ते दि. 01.01.2023 रोजी 05.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विकास थोरबोले यांनी दि.03.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


                                         

From around the web