उस्मानाबादेत गाडी पार्क करण्याच्या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण 

 
crime

उस्मानाबाद : भिमनगर, उस्मानाबाद येथील- राजाभाऊ आण्णाराव ओव्हळ व त्यांचा मुलगा- सिध्दार्थ हे दि. 10.11.2022 रोजी 21.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथे त्यांची गाडी पार्क करत असताना वडार गल्ली, उस्मानाबाद येथील- संदीप यल्लाप्पा बुट्टे, राहुल छोट्या मंजुळे, रोहीत हनुमंत जाधव यांसह 5 ते 6 व्यक्ती या सर्वांनी गाडी पार्क करण्याच्या कारणावरुन नमूद पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान केली. तसेच संदीप यांनी चाकुने व राहुल यांनी लोखंडी गजाने ठार मारण्याच्या उद्देशाने राजाभाऊ यांसह त्यांचा मुलगा- सिध्दार्थ यांना डोक्यात, हातावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. या मारहानीत राजाभाऊ यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सुवर्ण साखळी खाली पडून गहाळ झाली. अशा मजकुराच्या राजाभाऊ ओव्हळ यांनी दि. 11.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 307, 326, 324, 323, 504, 506, 427 सह ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा : लोहारा येथील- महोदव विजय गोरे हे दि. 09.11.2022 रोजी 18.30 वा. सु. लोहारा येथील आपल्या हॉटेलमध्ये असताना गावातीलच- अफजल पठाण, शहबाज हेड्डे यांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी तेथे जाउन महादेव गोरे यांना चहा मागितला. यावर गोरे यांनी पुर्वीच्या चहाचे पैसे मागीतले असता नमूद लोकांनी हॉटेलातील चहाची कॅटली बाहेर फेकून आतील साहित्याची तोडफोड केली. तसेच गोरे यांसह त्यांचा भाऊ- भागवत यांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन हॉटेल चालवायचे असल्यास तीस हजार रुपयाची मागणी करुन ते न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव गोरे यांनी दि. 11.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 384, 324, 323, 504, 506, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web