उस्मानाबाद जिल्ह्यात विनयभंग, फसवणूक, चोरी, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद -  जिल्हातील एका शासकीय कार्यालयातील महिला नोकरदाराशी बोलताना तीच्या कार्यालयातील दोन पुरुष सहकारी वेळोवेळी शं`गारीक शब्द वापरुन  तीला  टोमणे मारत असत. यावर तीने त्या दोघांना वेळोवेळी तसे न बोलण्याबाबत समज दिली असतानाही त्या दोघांनी  दि. 10 मार्च रोजी कार्यालयात पुन्हा तशाच स्वरुपाचे लैंगीक आकर्षनाचे टोमणे तीला मारुन तीचा विनयभंग केला. यावरुन त्या महिलेने 11 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं 354, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक 

वाशी  :  गोजवाडा येथील राजेंद्र थेारबोले यांनी मे 2012 मध्ये वाशी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेत जमीण तारण ठेउन कर्ज घेतले होते. बँकेची फसवणुक करण्याच्या उददेशाने त्यांनी या तारण जमीनीचे बँकेच्या संमतीशिवाय परस्पर वाटणीपत्र करुन ती जमीन पत्नी- कुसुम, भाउ-बाळासाहेब, भावजई- संगिता यांच्या नावे केली.या प्रकरणी बँकेचे प्रतिनिधी- बलभीम इरपे यांनी वाशी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात दिलेल्या प्रथम खबरेवर संबंधीत न्यायालयाने दिलेल्या आदेशाने वाशी पोलीस ठाण्यात भा.द.सं. कलम 420,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 चोरी

उमरगा  : कराळी फाटा येथील प्रसाद वडदरे यांच्या घरासमोरील युनिकॉर्न मोटार सायकल क्र. एम.एच. 24- एजे 4088 हि दि.6-7 मार्च दरम्याणच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या वडदरे यांच्या दि.11 मार्च रोजीच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 मारहाण

तुळजापुर  : काक्रंबा येथील गोपाळ साठे हे दि.10 मार्च रोजी सकाळी 06.00 वाजता त्यांच्या घरात असताना भाउबंद- रंजना साठे व कानेगाव ग्रामस्थ- नितीन लोभे यांनी घरात घुसुन पाईप लाईन फोडण्याच्या वादातुन गोपाळ यांना बांबुने मारहाण केल्याने गोपाळ यांच्या डोक्यास दुखापत झाली. अशा मजकुराच्या गोपाळ यांनी दि.11 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 452,324,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web