उस्मानाबाद जिल्ह्यात दि. २ फेब्रुवारी रोजी चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

ढोकी  : उस्मानाबाद तालुक्यातील पळसप ग्रामस्थ- अमोल विजय काळे यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप दि. 27- 28.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील 14 पोती सोयाबिन चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमोल काळे यांनी दि. 01.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : ठाणे जिल्ह्यातील श्रीमती अर्पिता मुर्गेश राजपुत, वय 50 वर्षे या दि. 01.02.2022 रोजी 15.45 वा. सु. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीरात दर्शनासाठी गेल्या असता अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या जवळील 25,000 ₹ रक्कम व कागदपत्रे असलेली पर्स चोरुन नेली. अशा मजकुराच्या अर्पिता राजपुत यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील ग्रामस्थ- चंद्रकांत भागवत शिंदे यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 6840 ही दि. 21- 22.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरासमोरुन चोरुन नेली. अशा मजकुराच्या चंद्रकांत शिंदे यांनी दि. 01.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

उस्मानाबाद  : ख्वाँजानगर, उस्मानाबाद येथील अजहर मुख्तार सय्यद यांना दि. 31.01.2022 रोजी 18.00 वा. सु. अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबाद समोरील उड्डानपुलावर स्कुटर क्र. एम.एच. 25 एटी 7572 वर आलेल्या तीन अनोळखी पुरुषांनी जुन्या वादावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कोयत्याने मारहान करुन अजहर यांना जखमी केले. अशा मजकुराच्या अजहर सय्यद यांनी दि. 01.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web