उस्मानाबादेत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार
Apr 28, 2022, 19:30 IST

उस्मानाबाद - एका तुरणाने शेजारील गावच्या एका 22 वर्षीय तरुणीशी (नाव- गाव गापेनीय) जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवून मागील दोन वर्षापासून तीच्यासोबत लैंगीक संबंध ठेवले. यावर त्या तरुणीने त्या तरुणाशी दोघांच्या लग्नासंबंधी बोलणी केली असता त्याने तीला टाळले व शिवीगाळ करुन मारहान केली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 27 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
एका गावातील दोन 17 वर्षीय मुली (नाव- गाव गोपनीय) दि. 25.04.2022 रोजी 10.00 ते 12.30 वा. सु. आपल्या घर परिसरात असतांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्या दोघींचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पालकाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.