उस्मानाबादेत अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले 

 
crime

उस्मानाबाद  : एका 17 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) नात्यातीलच एका पुरुषाने दि. 07 मे रोजी सकाळी 08.00 वा. सु. कामानिमीत्त मोटारसायकलवर बाहेर नेले. बराच वेळ झाल्याने ते घरी न परतल्याने मुलीच्या कुटूंबीयांनी नात्यातील त्या पुरुषाशी फोनद्वारे संपर्क साधला असता तो फोन उचलत नव्हता. यावर तीच्या कुटूंबीयांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या पुरुषाने फुस लावून तीचे अपहरन केले असल्याचे तीच्या कुटूंबीयांस समजले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक

तुळजापूर  : तुळजापूर येथील एसबीआय शाखेतील खातेदार- नितीन सतीश कणे यांच्या बॅंक खात्यातील 20,047 ₹ रक्कम दि. 10.11.2019 रोजी 14.11 वा. सु. बांद्रा, मुंबई येथील इंडीयन ओव्हरसिज बँक एटीएम येथून अज्ञात व्यक्तीने काढून बँकेची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या तुळजापूर एसबीआय शाखेचे शाखाधिकारी- कल्पेश नारायण घोडके यांनी दि. 21.05.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web