उस्मानाबादेत युक्रेन युद्धाची भीती दाखवून एकास लुटले 

 तीन तोळे सोने घेऊन दोन भामटे पसार 
 
crime

उस्मानाबाद  : वडगाव (सि.), ता. उस्मानाबाद येथील विश्वनाथ भिमराव मोरे, वय 75 वर्षे हे त्यांच्या मेहुणीसह दि. 02.03.2022 रोजी 14.00 वा. सु. देशपांडे स्टॉड, उस्मानाबाद येथील रस्त्याने स्कुटरने प्रवास करत होते. यावेळी पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी मोरे यांना हाटकून, “सध्या युक्रेनमध्ये युध्द चालू असून तुम्ही सोने घालुन का फिरता. ते सोने काढुन पिशवीत ठेवा.” असे सांगीतले. तसेच मोरे यांच्या मेहुणीस त्यांच्या हातातील 30 ग्रॅम वजनाच्या सुवर्ण पाटल्या काढण्यास लावून त्या दोघा भामट्यांनी त्या पाटल्या आपल्या हाताने मोरे यांच्या मेहुणीच्या पिशवीत ठेवल्यासारखे करुन त्या सुवर्ण पाटल्या घेउन तेथून पसार झाले. अशा मजकुराच्या विश्वनाथ मोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

वाशी  : पिंपळगाव (क.), ता. वाशी येथील बंकटराव रामभाउ आटोळे यांसह त्यांची पत्नी- शकुंतला, मुलगा- बालाजी, सुन- छाया या सर्वांनी शेत विहीरीतील पाणी वाटणीच्या कारणावरुन दि. 01.03.2022 रोजी 10.00 वा. सु. पिंपळगाव (क.) शिवारात नमूद चौघांनी दुसरा मुलगा- धनंजय बंकटराव आटोळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या धनंजय आटोळे यांनी दि. 02.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web