लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या चौघा आरोपींस कारावासासह दंड

 
crime

 तामलवाडी  : कर्तव्य बजावणाऱ्या लोकसेवकास त्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यास अडवून मारहान केल्याप्रकरणी तामलवाडी पो.ठा. येथील  गुन्हा क्र. 66/2015 चा तपास तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक- श्री. एस.एल. शिंदे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला 69/2019 ची सुनावणी उस्मानाबाद येथील जिल्हा व तदर्थ सत्र न्यायालय क्र. 1 येथे होउन आज दि. 29.11.2022 रोजी निकाल जाहिर झाला. यात न्यायाधीश मा. श्री. कर्वे यांनी तामलवाडी ग्रामस्थ- सिध्देश्वर भाले, सिराज शेख, जाकीर शेख, इरफान जहागीरदार या सर्वांना भा.दं.सं. कलम- 332 च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 6 महिने कारावासासह प्रत्येकी 2,000 ₹ दंड,  भा.दं.सं. कलम- 341 च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 1 महिना कारावासासह 500 ₹ दंड, भा.दं.सं. कलम- 353 च्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी 1 वर्षे कारावासासह 3,000 ₹ दंड अशा शिक्षा सुनावल्या आहेत.

रकमेच्या वसुलीसाठी अपहरण

 भूम : ग्राम- चुंब, ता. बार्शी येथील- सिध्देश्वर रामभाउ जाधवर, वय 62 वर्षे हे भुम येथील- सतिश भोळे यांना काही रक्कम देणे लागत होते. या रकमेच्या वसुलीचा तगादा सतिश भोळे यांनी सिध्देश्वर यांच्याकडे  लावला होता. तसेच रक्कम देणे शक्य नसल्यास सिध्देश्वर यांनी त्यांच्या भाउ- भावजयच्या मालकीचे भुम येथील घर व जागा आपल्या नावे करुण देण्याचा तगादा लावला होता. सिध्देश्वर हे दि. 23.11.2022 रोजी भुम येथे आले असता सतिश भोळे यांनी त्यांना एका अज्ञात स्थळी ठार मारण्याच्या उद्देशाने डांबुन ठेवले असून त्यांना सोडण्याच्या मोबदल्यात येणे असलेली ती रक्कम किंवा त्या मोबदल्यात नमूद घर व जागा मागत आहेत. अशा मजकुराच्या सिध्देश्वर यांचे भाऊ- अंगद रामभाऊ जाधवर, रा. गडहिंगलज, जि. कोल्हापूर यांनी दि. 28.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 342, 364 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web