लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या आरोपींस कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा

 
court

उस्मानाबाद : सांजा रोड, उस्मानाबाद येथील- आकाश दिलीप आवटे व ताकविकी येथील- अजीज अब्बास पठाण या दोघांनी लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा केला होता. या प्रकरणी उस्मानाबाद (श.) पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 435/2015 नोंदवण्यात येउन या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस हवालदार- श्री. आर.एम. कदम यांनी करुन तपासाअंती गुन्ह्याचे दोषारोपपत्र उस्मानाबाद सत्र न्यायालयात दाखल केले होते.

            यात साक्षीदारांच्या साक्ष, परिस्थितीजन्य पुरावे तसेच शासकीय अभियोक्ता- श्री. जयंत देशमुख यांच्या युक्तीवादातून या सत्र खटला क्र. 160/2019 ची तदर्थ सत्र न्यायालय क्र. 1, उस्मानाबाद येथे सुनावणी होउन काल दि. 15.10.2022 रोजी  सत्र न्यायाधीश . कर्वे यांनी आरोपी- अजीज पठाण यास भा.दं.सं. कलम- 353 च्या उल्लंघनाबद्दल 01 वर्षे कारावास व 5,000 ₹ दंड आणि भा.दं.सं. कलम- 332 च्या उल्लंघनाबद्दल 03 महिने कारावास व 3,000 ₹ दंड तसेच आरोपी- आकाश आवटे यास भा.दं.सं. कलम- 353 च्या उल्लंघनाबद्दल 5,000 ₹ दंड व भा.दं.सं. कलम- 332 च्या उल्लंघनाबद्दल 3,000 ₹ दंड अशा शिक्षा सुनावल्या आहेत.

From around the web