बेंबळी : गोवंशीय मांसाची अवैध वाहतूक

 
crime

बेंबळी  : बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय पोलीस उपनिरीक्षक- रियाज पटेल हे दि. 08 जून रोजी 08.45 वा. उस्मानाबाद- उजणी रस्त्यावर महादेववाडी फाटा येथे गस्त करत होते. यावेळी उस्मानाबाद येथील शब्बीर शेख हे आयशर मिनी ट्रक क्र. एम.एच. 25 एजे 0947 मधून अवैध कत्तलीतील 4 मेट्रीक टन गोवंशीय मांस वाहून नेत असल्याचे आढळले. यावरुन पटेल यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम- 5, 9 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 मालमत्ते विरुध्द गुन्हे

येरमाळा  : म्हसोबाचीवाडी, ता. वाशी येथील सुरज शेंडगे यांच्या कुलूप बंद घराचा दरवाजा दि. 07- 08 जून दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने उघडून कपाटातील 20 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शेंडगे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
रस्ता अपघात 

नळदुर्ग : मानेवाडी येथील अंकुश करनुरे हे दि. 04 जून रोजी 10.00 वा. तुळजापूर नळदुर्ग रस्त्यावरुन मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी मानेवाडी फाटा परिसरात प्रतिक मानधने, रा. पैठण यांनी निष्काळजीपने मोटारसायकल चालवल्याने ती मोटारसायकल अंकुश यांच्या मो.सा. ला धडकली. या अपघातात अंकुश हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या दि. 08 जून रोजी सचिन अंकुश कुरनुरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web