तुळजापुरात अवैध गुटखा वाहतूक, दोन गुन्हे दाखल
तुळजापूर : महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक तुळजापूर शहरातून दि. 27.02.2022 रोजी होणार असल्याच्या गोपनीय खबरेवरुन प्रभारी पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद नवनीत कॉवत व उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर .श्रीमती सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोनि- अजिनाथ काशीद, सपोनि- ज्ञानेश्वर कांबळे, पोउपनि- राहुल रोटे, पोना- राऊत, माळी, पोकॉ- सोनवणे, भोपळे यांसह स्था.गु.शा. च्या सपोनि- शैलेश पवार, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण यांच्या संयुक्त पथाकाने तुळजापूर येथील उस्मानाबाद रस्त्यावरील उड्डानपुलाखाली सापळा लावला.
दरम्यान पथकाने रात्री 23.30 वा. सु. अशोक लेल्यांड ट्रक क्र. के.ए. 32 सी 3731 या वाहनाची संशयावरुन तपासणी केली असता 1) भिमशहा गुरुशांतअप्पा घागी, रा. बसवकल्याण, जि. बिदर (ट्रक चालक) 2) महमंद अलताफ बाबुमिया सवार, रा. हुमनाबाद, जि. बिदर, राज्य कर्नाटक (ट्रक सहायक) हे दोघे ट्रकमध्ये सुगंधीत सुपारीची 298 पोती व गुटखा बनवण्यासाठी लागणारी पावडर 119 पोती अशा एकुण 96,23,000 ₹ किंमतीच्या प्रतिबंधीत अन्नपदार्थाची वाहतूक करत असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद मालासह ट्रक व नमूद दोघांना ताब्यात घेतले.
तर दुसऱ्या घटनेत तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 02.01.2022 रोजी 15.30 वा. सु. तुळजापूर येथील नळदुर्ग रस्त्यावर कर्तव्यावर असतांना संशयावरुन इनोव्हा कार क्र. एम.एच. 24 व्ही 0784 ची तपासणी केली असता तुळजापूर ग्रामस्थ- अखलाक उस्मान शेख हे नमूद कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या 90,000 ₹ किंमीच्या तंबाखुजन्य पदार्थाची वाहतुक करत असतांना मिळुन आले.
यावर नमूद प्रतिबंधीत अन्नपदार्थाविषयी अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांना कळवण्यात येउन अन्न सुरक्षा अधिाकरी- श्री. प्रमोदकुमार श्यामराव काकडे यांनी सदर प्रतिबंधीत अन्नपदार्थाची तपासणी करुन दि. 28.02.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 60 व 61 / 2022 हे भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27 सह वाचन कलम- 30 सह वाचन अधिनियम कलम- 2,3,4 नुसार खरेदी-विक्री व वाहतुक यांसाठी बंधीचे उल्लंघन दंडनिय कलम- 59 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.