सीना आणि मांजरा नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन 

 
crime

परंडा  : सीना नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन परंडा पो.ठा. च्या पथकाने 15 मे रोजी 13.40 वा. परंडा- मुंगशी रस्त्यालगत छापा टाकला. यावेळी नदी पात्रातून विना नोंदणीक्रमांकाच्या ट्रॅक्टर- ट्रेलरमध्ये सुमारे 1 ब्रास वाळूची अवैध वाहतूक माढा, जि. सोलापूर येथील दादा खंडागळे व नितीन महाडीक हे करत असल्याचे आढळले. यावर पथकाने ते ट्रॅक्टर- ट्रेलर ताब्यात घेउन पोलीस नाईक- श्रीकांत भांगे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 सह गौण खनिज कायदा- 48 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब : मांजरा नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पथकाने 15 मे रोजी 11.00 वा. आथर्डी येथे छापा टाकला. यावेळी नदी पात्रातून अकील पठाण, रा. लाखा हे एक्सकॅव्हेटर यंत्राच्या सहायाने अवैध वाळू उपसा करताना आढळले. तर बाळासाहेब लांडगे, समाधान लांडगे, रा. खोंदला, ता. कळंब यांसह ईरशाद पठाण, महंमद पठाण,रा. केज हे चौघे नोंदणी क्रमांक नसलेल्या दोन ट्रॅक्टर- ट्रेलर मधून एकुण 1.5 ब्रास वाळूची अवैध वाहतूक करत असल्याचे आढळले. यावर पथकाने एक्सकॅव्हेटरसह ते दोन ट्रॅक्टर- ट्रेलर ताब्यात घेउन पोलीस अंमलदार- अमोल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 सह गौण खनिज कायदा- 48 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


उमरगा  : कोरेगाववाडी, ता. उमरगा येथील चंद्रकांत वसंत माने यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 14- 15.05.2022 रोजी दरम्यानच्या रात्री तोडून घरात प्रवेश करुन पत्र्याच्या पेटीतील 20 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 8,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या चंद्रकांत माने यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web