रांजणीत कौटुंबीक वादातून पतीने केली पत्नीची हत्या 

 
crime

शिराढोण - रांजणी, ता. कळंब येथील विठ्ठल अप्पा संगापुरे यांनी कौटुंबीक वादाच्या कारणावरुन दि. 01.03.2022 रोजी 11.30 वा. सु. रांजणी गट क्र. 140 मधील शेतातील पत्रा शेडमध्ये त्यांची पत्नी- मंगल विठ्ठल संगापूरे, वय 55 वर्षे यांच्या गळ्यावर ऊस तोडणीच्या कोयत्याने वार करुन त्यांचा खून केला. अशा मजकुराच्या परमेश्वर विठ्ठल संगापुरे, रांजणी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण 

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील एका गावातील एक 14 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 24.02.2022 रोजी 22.30 वा. सु. आपल्या घरात असतांना लातूर जिल्ह्यातील नात्यातीलच 2 पुरुष व एका महिलेने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे.

तर दुसऱ्या घटनेत एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 22.02.2022 रोजी 13.30 ते 17.30 वा. दरम्यान आपल्या घरात असतांना शेजारील गावच्या ओळखीच्या तरुणाने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलींच्या पित्याने दि. 01.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 34 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web