येडशीजवळ टेम्पोने धडक दिल्याने पती ठार, पत्नी जखमी 

 
crime

उस्मानाबाद : तेरखेडा ता. वाशी येथील- दत्तात्रय शिवराम काळे, वय 52 वर्ष व त्यांची पत्नी- सावित्राबाई असे दोघे दि.13.12.2022 रोजी 09.00 वा.सु. येडशी टोलनाक्याचे पुढे आळणी चौकात एन.एच.52 हायवे रस्त्यावर मोटरसायकल क्र.एम.एच.25एई 7376 वरुन जात होते. यावेळी अज्ञात चालकाने टॅम्पो वाहन क्र.एम.एच.24 फ 6090 हा निष्काळजीपने चालवल्याने नमूद दोघांना अचानक उजव्या बाजूने धडकला. 

या अपघातात दत्तात्रय शिवराम काळे हे मयत होउन त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सावित्राबाई काळे यांनी दि.25.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


कामेगावमध्ये  हाणामारी 

 उस्मानाबाद  : जुन्या भांडणाच्या कारणावरुन कामेगाव ता.जि. उस्मानाबाद येथील- कृष्णात मोहन झोरे यांना दि.25.12.2022 रोजी 08.30 वा. सु. जोगेश्वरी धाब्या जवळ रोडवर अनिल जाधव (पत्ता उपलब्ध नाही) यांनी पाटीमागील भांडणाचा राग मनात धरून कृष्णात यानां शिवीगाळ करून लाथ मारल्याने कृष्णात यांचा उजवा पाय फॅक्चर झाला. अशा मजकुराच्या कृष्णात झोरे यांनी दि. 25.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325 323, 504, अंतर्गत गुन्हा नों

From around the web