घरासाठी ३५ लाख रुपये दे म्हणून शासकीय सेवेत असलेल्या पत्नीचा छळ 

पती अभिजित पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
 
crime

उस्मानाबाद - लग्नात योग्य मानपान केला नाही, मागणीप्रमाणे सोन्याचे दागिने केले नाहीत तसेच घरासाठी ३५ लाख रुपये दे म्हणून शासकीय सेवेत असलेल्या पत्नीचा छळ आणि जाच केल्याप्रकरणी रामवाडी ( ता. उस्मानाबाद ) येथील शिक्षक अभिजित अरविंद पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध सांगली जिल्ह्यातील आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी पत्नी या मुंबईत शासकीय नोकरदार असून, माहेर आष्टा, ता. वाळवा, जिल्हा सांगली आहे तर सासर रामवाडी ( ता. उस्मानाबाद ) असून, पती अभिजित अरविंद पाटील शिक्षक असून, मुरुड ( ता. लातूर ) येथे नोकरी करीत आहेत. 

उभयतांचा विवाह २१ / २/ २०२१ रोजी आष्टा, ता. वाळवा येथे झाला होता. लग्नानंतर एक वर्षाच्या आतच सासरची मंडळी लग्नात योग्य मानपान केला नाही, दहा तोळे मागणी केल्याप्रमाणे सोन्याचे दागिने केले नाहीत तसेच घरासाठी ३५ लाख रुपये दे म्हणून छळ आणि त्रास देऊ लागले. 

मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पत्नीने ११ / ४ / २२ रोजी आष्टा , ता. वाळवा पोलीस स्टेशनमध्ये पती अभिजित अरविंद पाटील  तसेच सासरे अरविंद नारायण पाटील, सासू भाग्यशाला अरविंद पाटील नणंद त्रिशूला विद्यासागर कोळी, सुषमा अंकुश माने यांच्याविरुद्ध भादंवि ४९८ A , ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिजित अरविंद पाटील हा गुंड आणून मारहाण करतो, तुला जीवे मारतो अश्या धमक्या देत असल्याचे फिर्यादी पत्नीचे म्हणणे आहे. आपणास वडील आणि भाऊ नसल्याने त्याचा गैरफायदा घेऊन हा त्रास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

From around the web