उस्मानाबाद जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदीचा हैदोस 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : उसमानाबाद जिल्हा कारागृह प्रशासनातील  सुभेदार- भगवान सरदार हे दि. 09.02.2022 रोजी 16.15 वा. कारागृहात कर्तव्यास होते. यावेळी न्यायाधीन बंदी 1) लहू पवार, रा. उस्मानाबाद 2) संजय राठोड, रा. जहागीरदारवाडी, ता. उस्मानाबाद या दोघांनी सरदार यांना हटकून, “तुम्ही आम्हाला लय त्रास देता.” असे धमकावून सरदार यांची गचांडी धरुन त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. अशा प्रकारे नमूद दोघांनी कारागृह प्रशासनाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन भगवान सरदार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा आणनाऱ्यांवर गुन्हा दाखल

परंडा : गौण खनिजाचा (वाळु) अवैध उपसा व वाहतुक होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन परंडा महसुल विभागाचे पथक दि. 09.02.2022 रोजी 05.00 वा. सु. तालुकयातील कारंजा शिवारात गेले होते. यावेळी कारंजा ग्रामस्थ- सौदागर भास्कर इंगळे, विशाल जगन्नाथ गुटाळ, सचिन भास्कर इंगळे, वैभव कल्याण गोरे, शरद कल्याण गोरे यांसह लोणी ग्रामस्थ- विजय भागवत हे सर्व वाळु उपसा करुन ट्रॅक्टर-ट्रेलरमधून चोरुन नेत असतांना आढळले. यावर पथकाने कारवाई कामी त्यांना हटकून वाळुसह ट्रॅक्टर- ट्रेलर तहसील कार्यालय, परंडा येथे नेण्यास ताब्यात घेतला. यावर नमूद लोकांनी पथकास अरेरावी, शिवीगाळ व धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन तलाठी- कपील अंबादास सिरसाट यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 379, 143, 147, 149, 504, 506 सह म.ज.म.ह. अधिनियम- 48 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web