उस्मानाबाद - लातूर रस्त्यावर जॅक टाकून वाहने लुटणारी टोळी जेरबंद 

 
s

उस्मानाबाद  : उस्मानाबाद - लातूर तसेच येडशी - लातूर रस्त्यावर जॅक टाकून वाहने  लुटणारी  टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश आले आहे. 

लातुर येथील- नामदेव भालेराव, वय 47 वर्षे हे दि. 27.12.2022 रोजी 01.30 वा. सु. तडवळा शिवारातील रस्त्याने ओमनी वाहन क्र. एम.एच. 48 ए 6871 ही चालवत जात होते. दरम्यान त्यांच्या वाहनाखाली अचानकपणे काहीतरी वस्तू अडकल्याने ते पाहण्यासाठी खाली उतरले असता अंधारात दबा धरुन बसलेल्या चार अनोळखी इसमांनी भालेराव यांना धाक दाखवून त्‍यांच्याजवळील अंदाजे 2,000 ₹ किंमतीचा सॅमसंग मोबाईल फोन जबरीने नेला होता. तसेच जांभरुण, ता. मंठा, जि. जालना येथील- अजय जाधव यांसह अन्य सात लोक हे याच दिवशी 03.00 वा. सु. आळणी शिवारातील जवळे (दु.) फाटा येथील रस्त्याने अरटीगा कार क्र. एम.एच. 20 सीएच 7550 ने प्रवास करत होते. यावेळी रस्त्यावर असलेला जॅक नमूद कारला अडकल्याने चालक- अजय जाधव यांनी कार थांबवली असता चार अनोळखी व्यक्तींनी अचानकपणे कारजवळ येउन कारमधील लोकांना दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. तसेच चाकूचा धाक दाखवून कारमधील लोकांजवळील 24 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, तीन मोबाईल फोन व 5,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 82,000 ₹ चा माल लुटून पसार झाले होते.

अशा मजकुराच्या नामदेव भालेराव व अजय जाधव या दोघांनी दि. 27.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 457/2022 व उस्मानाबाद ग्रा. पो.ठा. येथे गुन्हा क्र. 261/2022 हे भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत नोंदवलेले आहेत.

            गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारधी पिढी, ढोकी येथील- गंगाराम सुबराव पवार उर्फ गंज्या, वय 19 वर्षे व बीभीषण नाना काळे, वय 23 वर्षे यांना पारधी पिढी शिवारातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने सरद गुन्हा त्याच्या अन्य चार साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी दोन मोबाईल फोन, 5,000 ₹ रोख रक्कमेसह गुन्हा करण्यास वापरलेल्या दोन मोटारसायकल असा एकुण 1,55,000 ₹ माल हस्तगत केला असून त्याच्या अन्य चार साथीदारांचा पोलीश शोध घेत आहेत.

            सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि-  यशवंत जाधव, पोउपनि- संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहाण पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, दिनेश उंबरे, बबन जाधवर, महेबुब अरब, टेक्निकल ॲनालीसी‍स विंगचे अंमलदार- सुनिल मोरे, अशोक कदम यांच्या पथकाने केली आहे.

From around the web