उस्मानाबादेत अगरबत्ती  मशीन प्रकरणी तेरा लाखाची फसवणूक 

 
crime

उस्मानाबाद : दिघोळ (आंबा), ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील- अजित राम मुळीक यांनी भिमनगर, उस्मानाबाद येथील लता मनोज शिंगाडे यांसह त्यांचे 7 सहकारी यांना अगरबत्ती तयार करण्याच्या मशीन व त्यासाठी लागणारा कच्चा माल आणुन देतो असे अश्वासन देउन त्यासाठी मुळीक यांनी दि. 24.09.2022 ते दि. 25.09.2022 रोजी दरम्यान लता शिंगाडे यांसह त्यांच्या सहकाऱ्यांकडून एकुण 13,60,000 ₹ रक्कम घेतली. तसेच ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता मुळीक यांनी जुन्या मशीन देउन लागणारा कच्चा मालही न देता लता शिंगाडे यांसह त्यांच्या 7 सहकाऱ्यांची फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या लता शिंगाडे यांनी दि. 28.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या दोन घटना 
 

येरमाळा  : कडकनाथवाडी, ता. वाशी येथील- धनंजय अरुण शिंदे यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एबी 0107 ही दि. 19.09.2022 रोजी 15.00 ते 19.30 वा. दरम्यान तेरखेडा येथील उड्डानपुलाजवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या धनंजय शिंदे यांनी दि. 28.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : बीड येथील- अशोक सखाराम कातांगळे हे दि. 24.09.2022 रोजी रात्री तुळजापूर येथून ज्योत घेउन आपल्या होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 23 बीई 0690 वरुन बीडकडे जात होते. दरम्यान त्यांनी 23.30 वा. ते दि. 25.09.2022 रोजी 02.00 वा. दरम्यान शिंगोली फाटा येथील रायकड हॉटेलजवळ आपली मोटारसायकल लावली असता ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक कातांगळे यांनी दि. 28.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web