भाटसांगवीच्या  शेतकऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

 
crime

कळंब  : भाटसांगवी, ता. कळंब येथील दत्तात्रय चंद्रभान गायकवाड यांनी गट क्र. 221/ब/ 02 मधी 1 हेक्टर 82 आर या क्षेत्राचे बनावट रेखांकन व खोटे दस्तऐवज तयार करुन ते दुय्यम निबंधक कार्यालय, कळंब येथे दि. 16.01.2016 ते 21.12.2018 या कालावधीत वेळोवेळी सादर करुन त्यांनी शासनाची फसवणूक केली. अशा मजुराच्या प्रभारी दुय्यम निबंधक- सुरेश भिवराव पवार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 467 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

तुळजापूर  : शुक्रवार पेठ, तुळजापूर येथील प्रकाश भालचंद्र पेंदे यांच्या शेतातील 5 शेळ्या व 1 बोकड दि. 04- 05.03.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या शेतातील सालगड्याने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रकाश पेंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web