उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल
अंबी : साकत (खु.), ता. परंडा येथील माधवराव मानिकराव हुके यांच्या शेतात साकत (खु.) शिवारातील तलावातून घेतलेली 250 फुट लांब हस्ती पाईपलाईन व 250 फुट वायर दि. 04- 05 जून रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या माधवराव हुके यांनी दि. 06 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील संजीव मुरलीधर जाधव यांच्या शेतातील कुपनलीकेतील विद्युत पंप दुरुस्त करण्यासाठी कुपनलीकेतून काढलेले 2 इंची 27 लोखंडी पाईप दि. 04- 05 जून रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या संजीव जाधव यांनी दि. 06 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : सोनार गल्ली, कळंब येथील दत्ता गोविंदराव महामुनी यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 3256 ही दि. 30.05.2022 रोजी 15.30 ते 16.30 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दत्ता महामुनी यांनी दि. 06 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : दहीवाडी ग्रामस्थ- आकाश गाटे यांना अज्ञात व्यक्तीने दि. 18 ते 27 एप्रील दरम्यान वेळोवेळी फेसबूक व व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधून बीटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास 24 तासांत दुप्पट परताव्याचे आमिष दाखविले. त्या आमिषास भुलून गाटे यांनी त्या अज्ञात व्यक्तीस ऑनलाईन व्यवहाराद्वारे वेळोवेळी एकुण 1,72,332 ₹ रक्कम दिली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याची गाटे यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या आकाश गाटे यांनी दि. 06 जून रोजी तामलवाडी पो.ठा. येथे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून उर्वरीत तपास सायबर पोलीस ठाण्यामार्फत केला जात आहे.
अपहरण
उस्मानाबाद : एका गावातील 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 03 जून रोजी 10.00 वा. सु. बँकेच्या कामानिमीत्त शहरात गेली होती. ती लवकर घरी न परतल्याने तीच्या कुटूंबीयांनी तीचा नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेतला असता तीच्याबद्दल उपयुक्त माहिती न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दि. 06 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.