उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे 

 
crime

वाशी  : वाशी ग्रामस्थ- पांडुरंग लिंबाजी माने हे 52 वर्षीय गृहस्थ दि. 12 जून रोजी 20.00 वा. सु. इंदापूर येथील साखर कारखान्याजवळील रस्त्याने प्रवास करत होते. यावेळी तीन अनोळखी पुरुषांनी माने यांची गाडी अडवून तीची किल्ली काढून घेतली. तसेच माने यांना रस्त्याबाजूला नेउन चाकूच्या धाकाने त्यांच्या जवळील 5 ग्रॅम वजनाची सुवर्ण अंगठी, सॅमसंग स्मार्टफोन व 140 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या पांडुरंग माने यांनी दि. 13 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : जवाहर गल्ली, तुळजापूर येथील रोहन नागनाथ पांढरे यांना दि. 13 जून रोजी 01.30 वा. सु. त्यांच्या घरासमोर गावकरी- विश्वजीत आमृतराव, सुशांत सपाटे, सव्प्नील यांनी कोयत्याचा धाक दाखवून पांढरे यांच्या खिशातील 2,000 ₹ रक्कम जबरीने काढून घेतली. तसेच पांढरे यांच्या घरासमोरील यात्रेकरुच्या कारची काच तसेच तुळजापूर शहरातील अन्य 16 गाड्यांची काच काठीने व दगडाने फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या रोहन पांढरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 427, 34 सह शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : लातुर येथील विजयकुमार मल्लिकार्जुन तांबोळकर यांनी आलमप्रभु ट्रान्सपोर्ट, बार्शी चे मालक- संदिप रमेशलाल सुराना, ट्रक क्र. एम.एच. 40 बीजी 4818 चे चालक- योगेश गवारे व अजय जाधव, दोघे रा. औरंगाबाद यांना दि. 07 जून रोजी 16.00 वा. सु.  प्रत्येकी 30 कि.ग्रॅ. वजनाच्या 667 गुळाच्या पिशव्या ठरलेल्या पत्यावर पोहचविण्यासाठी दिल्या होत्या. परंतु नमूद तीघांनी तो माल दि. 13 जून रोजी 10.00 वा. पर्यंत तांबोळकर यांनी सांगितलेल्या ठिकाणी न पोहचवता संगणमताने नमूद मालाचा न्यासभंग केला. अशा मजकुराच्या तांबोळकर यांनी दि. 13 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 409 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : वैराग नाका, उस्मानाबाद येथील नेताजी दगडु गेजगे यांच्या राघुचीवाडी गट क्र. 638/ 04 मधील शेतातील कुपनलिकेतील युनिटेक कंपनीची 5 × 35 विद्युत मोटार दि. 12- 13 जून रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नेताजी गेजगे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web