उस्मानाबाद जिल्ह्यात  २ फेब्रुवारी रोजी चार अपघातात चार ठार, दोन जखमी 

 
Osmanabad police

वाशी : ट्रक क्र. जी.जे. 10 एक्स 9826 हा दि. 31.01.2022 रोजी 21.30 वा.सु. प्रवासादरम्यान पारगांव येथील टोलनाक्याजवळ अंदाजे एक कि.मी. अंतरावर नादुरुस्त झाल्याने तो ट्रक रस्त्याबाजूस घेउन ट्रकमधील चालक- इसाक ईस्माईल नाई यांसह ट्रकमधील युसुफ बोदुभाई हालेपोतरा, वय 43 वर्षे, फिरोज नुरम नुरहामद कुरेशी, वय 31 वर्षे तीघे रा. जामनगर, राज्य- गुजरात असे तीघे ट्रकमधून खाली उतरले होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. जी.जे. 08 ए 7764 हा निष्काळजीपने चालवल्याने ईसाक नाई यांच्या उपरोक्त नमूद ट्रकला पाठीमागून धडकला. या अपघातात सुसुफ हालेपोतरा व फिरोज कुरेशी हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या चालक- इसाक नाई यांनी दि. 01.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : चालक- प्रेमनाथ करण कोळी, रा. माडज, ता. उमरगा यांनी दि. 28.01.2022 रोजी 18.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील महालिंगरायवाडी कमानीजळ मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 6042 ही निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या रविराज गोविंद भोसले, वय 35 वर्षे, रा. रामपुर, ता. उमरगा यांना पाठीमागून धडकली. या अपघातात रविराज हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- श्रीनिवास गोविंद भोसले यांनी दि. 01.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : हैद्राबाद, राज्य- तेलंगण येथील अरविंद कपुरचंद जैन हे कुटूंबीयांसह दि. 25.12.2021 रोजी 05.00 वा. सु. शिंगोली येथील महामार्गावर चारचाकी वाहन क्र. टी.एस. 08 एचआर 8222 ने प्रवास करत होते. यावेळी जैन चालवत असलेल्या वाहनास अज्ञात वाहनाने समोरुन दिलेल्या धडकेत अरविंद जैन यांची पत्नी- सुनिता अरविंद जैन, वय 40 वर्षे या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. या अपघातात अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या अरविंद जैन यांनी दि. 01.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : उक्कडगांव, ता. बार्शी येथील बाबासाहेब सानप यांसोबत त्यांची पत्नी- जनाबाई असे दोघे दि. 09.01.2022 रोजी 16.00 वा. सु. सापनाई फाटा येथील महामार्ग ओलांडण्यासाठी मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीएन 4522 सह थांबले होते. यावेळी अज्ञात चालकाने इनोव्हा कार क्र. एम.एच. 23 एस 5858 ही निष्काळजीपने चालवल्याने बाबासाहेब सानप यांच्या मोटारसायकलला धडकल्याने नमूद सानप पती- पत्नी हे गंभीर जखमी होउन त्यांच्या मोटारसायकलचे आर्थिक नुकसान झाले. अपघातानंतर नमूद इनोव्हाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या जनाबाई सानप यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web