उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात चार जखमी 

 
crime

कळंब  :  खामसवाडी ग्रामस्थ कल्याण शेळके हे दिनांक 18 एप्रील रोजी 12.15 वा कळंब येथील संत तुकाराम महाराज चौकात होते. यावेळी बिड येथील वासुदेव बिक्कड यांनी मोटार सायकल निष्काळजीपणे चालवल्याने मोटार सायकलची धडक कल्याण यांना लागुन त्यांच्या डोक्यास व उजव्या पायास दुखापत झाली.  अशा मजकुराच्या कल्याण  यांनी  वैद्यकिय उपचारा दरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 279,337, मो वा का 184 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  :  गुलामरसुल वकालिया रा.गुजरात राज्य यांनी दिनांक 18 एप्रील रोजी 10.30 वा सोलापुर तुळजापूर महामार्गावर सुरतगाव शिवारात ट्रक क्रमांक जी जे 3 बी टी 1827 ही निष्काळजीपणे चालवल्याने पुढे जात असलेल्या एका एस टी बसला व ट्रकला पाठीमागुन त्यांच्या ट्रकची धडक लागली. या अपघातात तिन्ही वाहनांची मोडतोड होउन  आर्थीक नुकसान झाले तसेच बस मधील एका प्रवाशासह पुढील ट्रकचा चालक जखमी झाला. अशा मजकुराच्या बसचालक प्रवीण नाडे  यांनी  वैद्यकिय उपचारा दरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 279,337,427 मो वा का 184 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई 

 जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि. 18 एप्रिल रोजी  मौजे केशेगाव व बेंबळी येथे छापा टाकला असता अनुक्रमे मारुती छत्रगुण गवळी व अस्लम पठाण हे मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने साहित्य व एकुण रोख रक्कम 510 रु व 210 रु बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web