उस्मानाबाद जिल्ह्यात ६ फेब्रुवारी रोजी हाणामारीच्या चार घटना 

 
Osmanabad police

बेंबळी  : नांदुर्गा, ता. उस्मानाबाद येथील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत वामनराव खटके यांनी  15 व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत निधी वापराविषयी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. या कारणावरुन वडाळा येथील- किशोर दिलीप पाटील (उपसरपंच), आकाश कामटे, रा. धारुर, सुजीम मुंढे, रा. उतमीकायापूर यांसह नांदुर्गा ग्रामस्थ- हनुमंत देवकते (पोलीस पाटील), गोपाळ पाटील, अंबादास डवकरे, बाळासाहेब डवकरे या सर्वांनी दि. 05.02.2022 रोजी 19.00 वा. सु. लक्ष्मीकांत खटके यांच्या घरात घुसून त्यांचा भाऊ- शशिकांत लोखंडी नळी, कत्ती, दगड, काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले. यावेळी शशिकांत यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नी- अनुसया व भावजय- आशाबाई यांनाही नमूद लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शशिकांत खटके यांनी दि. 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 452, 143, 147, 148, 149, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तर याच प्रकरणी किशोर दिलीप पाटील, रा. वडाळा, ता. उस्मानाबाद यांनी प्रथम खबर दिली की किशोर पाटील हे मित्र-आकाश कांबळे, रा. धारुर यांसह शशिकांत वामन खटके यांच्या घरी दि. 05.02.2022 रोजी 19.30 वा. सु ग्रामपंचायतीच्या कामासंबधी चर्चा करण्यासाठी गेले होते. यावेळी शशिकांत व लक्ष्मीकांत वामन खटके यांसह मिराबाई लक्ष्मीकांत खटके, सचिन डवकरे यांनी किशोर पाटील यांना, “14 व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत निधी वापराविषयी तु जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार का केली ?” असा जाब  विचारुन किशोर यांसह आकाश कांबळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, उलट्या कत्तीने मारहान केली. या मारहानीत आकाश यांच्या डाव्या हाताचा अंगठा मोडला.

अशा मजकुराच्या किशोर पाटील यांनी दि. 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : नारंगवाडी, ता. उमरगा येथील ज्योतिबा चव्हाण हे दि. 05.02.2022 रोजी 19.00 वा. सु. गावातील आपल्या हॉटेलसमोर होते. यावेळी हॉटेलात आलेल्या गावातील- प्रकाश सुरेश घंटे यांनी चिवड्यावर लिंबु न दिल्याच्या कारणावरुन ज्योतिबा यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन कुऱ्हाडीने ज्योतिबा यांच्या उजव्या हातावर घाव घालून कुऱ्हाडीचा दांडा त्यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ज्योतिबा चव्हाण यांनी दि. 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन येळी, ता. उमरगा येथील बंटी व बाबा प्रभाकर पवार या दोघा भावांनी दि. 05.02.2022 रोजी 17.00 वा. सु. रामपुर ग्रामस्थ- निरंजन रमेश माळी यांना रामपुर येथील एका चहा हॉटेलजवळ शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. या मारहानीत निरंजन यांच्या हाताचे हाड मोडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या निरंजन माळी यांनी दि. 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान विश्वस्त व्यवस्था अंतर्गतच्या तुळजाभवानी मंदीरात पुजारी- संकेत अनिल शिंदे यांनी गैरवर्तन / नियमभंग केल्याने त्यांना मंदीर प्रशासनाने 6 महिने कालावधीकरीता मंदीरात प्रवेश बंदी केली आहे. असे असतांनाही दि. 06.02.2022 रोजी 09.31 वा. सु. शिंदे यांनी आपल्या सोबत सोबत भाविकांना घेउन मंदीर प्रवेशाचा प्रयत्न केला. यावेळी तेथील महिला सुरक्षा रक्षकाने त्यांना मंदीर प्रवेशास विरोध केला असता शिंदे यांनी त्या सुरक्षा रक्षकास अश्लील शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. यावरुन संबंधीत सुरक्षा रक्षकाने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 323, 294, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web