उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 
crime

परंडा  : पिंपळवाडी, ता. परंडा येथील संगीता संतोष होरे यांसह कुटूंबातील 3 व्यक्तींचा गावकरी- अनिता बाळासाहेब होरे यांसह कुटूंबातील 2 व्यक्तींशी शेतजमीन मालकी व शेतातील ऊस पीक तोडणीच्या कारणावरुन दि. 28.02.2022 रोजी 17.30 वा. सु. पिंपळगाव गट क्र. 147 मधील शेतात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने, ऊसाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संगीता होरे व अनिता होरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

बेंबळी  : पाटोदा, ता. उस्मानाबाद येथील दादासाहेब मोहन पटाडे यांनी त्यांच्या मालकीची आंबेवाडी येथील गट क्र. 202 मधील शेतजमीन विक्री केली आहे. दादासाहेब व भाऊबंद- बाबासाहेब भगवान पटाडे यांच्यात सामाईक कुपनलीका असून दादासाहेब यांनी शेतजमीन विक्री केलेल्या व्यक्तीस बाबासाहेब पटाडे हे त्या कुपनलीकेतील पाणी घेउ देत नसल्याचा जाब दादासाहेब यांनी दि. 27.02.2022 रोजी 16.00 वा. सु. आंबेवाडी शिवारात बाबासाहेबांस विचारला असता बाबासाहेब यांसह सागर पटाडे, भाउराव भोसले, वामन भोसले या सर्वांनी दादासाहेब यांना शिवीगाळ करुन वायरने व उलट्या कोयत्याने मारहान करुन दादासाहेब यांच्या गळ्यातील गळ्यातील 22 ग्रॅम वजनाची सुवर्ण साखळी काढून घेतली. अशा मजकुराच्या दादासाहेब यांनी दि. 01.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 327, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : कदेर, ता. उमरगा येथील अंजली बिराजदार, रमेश बिराजदार, रंजना बिराजदार, दत्ता कदेरे, सुंदर कदेरे, हणुमंत कदेरे, अमोल बिराजदार, बाळु बिराजदार, लुबा या सर्वांनी दि. 28.02.2022 रोजी 13.00 वा. सु. गावातील भाऊबंद- मुकुंद बिराजदार यांच्या घरात घुसून शेत रस्त्याने रहदारी करुन देत नसल्याच्या कारणावरुन मुकुंद बिराजदार यांसह त्यांची पत्नी- सुवर्णा व दोन मुले यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी देउन मुकुंद यांच्या घराचा दरवाजा तोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या सुवर्णा बिराजदार यांनी दि. 01.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : बारुळ, ता. तुळजापूर येथील ठोंबरे कुटूंबातील प्रभाकर, चंदु, नितीन, सचिन, वैभव व चंदु यांची पत्नी या सर्वांनी दि. 01.03.2022 रोजी 12.30 वा. सु. व्हनाळा, ता. तुळजापूर येथील विजय पांडुरंग माने हे बारुळ येथील आपल्या शेतात असतांना तेथे जाउन शेत जमीन मालकीच्या कारणावरुन विजय माने यांसह त्यांच्या कुटूंबीयास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व शेतात परत पाय ठेवल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विजय माने यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 341, 347, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web