उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना 

 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापूर येथील नानासाहेब साळुंके, यश साळुंके यांसह विठ्ठल कांबळे, रा. भातंब्री, सुशांत नरवडे, रा. मसला (खु.), राम माने, समाधान घोडके, दोघे रा., चिंचोली, लक्ष्मण कोरे, रा. हंगरगा व अन्य 2 परुष या सर्वांनी जुन्या भांडणावरुन दि. 19.02.2022 रोजी 12.00 वा. सु. जुने बस स्थानक, तुळजापूर येथे तुळजापूर (खुर्द) येथील- ज्योतीराम कालीदास जाधव यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने, कंबर पट्ट्याने मारहान केली. अशा मजकुराच्या ज्योतीराम जाधव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : माळकरंजा, ता. कळंब येथील विश्वनाथ मारुती कराड व अदित्य या दोघा पिता- पुत्रांनी सामाईक बांधाच्या कारणावरुन दि. 19.02.2022 रोजी 14.00 रोजी माळकरंजा गट क्र. 267 मधील शेतात भाऊ- भास्कर मारुती कराड यांना शिवीगाळ करुन लाथाबुकक्यांनी काठीने मारहान केली. तसेच विश्वनाथ यांनी भास्कर यांच्या डाव्या हातास चावून त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या भास्कर कराड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : शास्त्रीनगर, उमरगा येथील लिंगप्पा गुंडप्पा माळी यांनी आपल्या आईस भांडणे केल्याचा जाब भाऊबंद- मल्लिनाथ गुंडप्पा माळी यांना दि. 18.02.2022 रोजी 20.00 वा. सु. राहत्या गल्लीत विचारला. यावर मल्लिनाथ माळी यांसह श्रीदेवी माळी, रितेश जगदे यांनी लिंगप्पा माळी यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, वेळुच्या काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या लिंगप्पा माळी यांनी दि. 19.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : वाकड, पुणे येथील राहुल पांडुरंग कोळी, अमोल कोटी, नंदाबाई कोळी या तीघांनी कौटूंबीक कारणावरुन दि. 18.02.2022 रोजी 23.15 वा. सु. हळदगाव, ता. कळंब येथील नातेवाईक- पंढरी काशीनाथ कोळी यांसह मयुर दत्तात्रय आदटराव यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहान करुन पंढरी कोळी यांना विट फेकून मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या पंढरी कोळी यांनी दि. 19.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web